Aluminium Vessels for cooking, Side Effects Of Cooking In Aluminium Utensils, Alzheimer Disease
Aluminium Vessels for cooking, Side Effects Of Cooking In Aluminium Utensils, Alzheimer Disease  ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवल्याने अल्झायमरचा धोका वाढू शकतो

कोमल दामुद्रे

मुंबई : अ‍ॅल्युमिनियमच्या भांड्यात आपण जेवण बनवतो. त्याच कढईत पुरी किंवा तळण्याचे पदार्थ त्यात बनवत असतो. परंतु, संशोधनांनुसार असे आढळून आले आहे की, अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये अन्न शिजवल्याने अल्झायमर रोगाचा धोका वाढू शकतो. (Aluminium Vessels For Cooking)

हे देखील पहा -

अॅल्युमिनियमच्या कढईत अन्न शिजवल्यामुळे अन्नासोबत अॅल्युमिनियमच्या सूक्ष्म कणांचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो. अल्झायमर सोबत, यामुळे ऑस्टिओपोरोसिस, किडनी निकामी होणे आणि इतर अनेक आरोग्याच्या समस्या देखील होऊ शकतात. अल्झायमरच्या आजारात ९० टक्के रुग्णांचा समावेश आहे. त्यातील ३० टक्के रुग्ण हे सौम्य, मध्यम व गंभीर आजारांने त्रस्त आहेत.

अॅल्युमिनियमच्या भांड्यांमध्ये अन्नपदार्थ हे अधिक वेळ तळले जातात. किंवा ते सतत ढवळत राहिल्यास भांड्यांमधील अॅल्युमिनियमचे प्रमाण उच्च तापमानाला वितळू लागते. हे धातू आपण नंतर खात असलेल्या अन्नामध्ये मिसळते आणि त्यामुळे आपल्या पचनसंस्थेला हानी पोहोचते. अॅल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर केल्यास अल्झायमरची तीव्रता जास्त होते. तसेच अॅल्युमिनियमच्या फॉइल पेपरमध्ये अन्नपदार्थ गुंडाळल्यामुळेही हा आजार वाढू शकतो. (Side Effects Of Cooking In Aluminium Utensils)

संशोधकांनी सांगितले आहे की, अॅल्युमिनियम कूकवेअर न वापरण्याची, स्टेनलेस स्टील किंवा ओव्हन-फ्रेंडली काचेच्या कूकवेअरने बदलण्याची शिफारस केली आहे. लोखंडी कढई यासाठी चांगला पर्याय आहे कारण ते कोणत्याही कृत्रिम किंवा हानिकारक पदार्थ नसतात. अन्नातील लोह सामग्री देखील वाढवतात जे आरोग्यदायी (Health) आणि फायदेशीर (Benefits) आहे अॅल्युमिनियमच्या वापरापेक्षा वेगळे असते. त्यासाठी अॅल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर शक्यतो टाळावा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Singham Again Shooting In Jammu : 'सिंघम अगेन'च्या सेटवरून फायटिंगचा सीन व्हायरल; अजय- जॅकी एकमेकांना भिडले...

SRH vs PBKS: अखेरच्या सामन्यात पंजाबच्या फलंदाजांची बॅट तळपली! हैदराबादसमोर विजयासाठी २१५ धावांची गरज

Today's Marathi News Live: पिंपरी चिंचवड शहरात आज पुन्हा वळवाच्या पावसाची हजेरी

Singapore Corona News |चिंता वाढली! सिंगापूरमध्ये पुन्हा कोरोनाचा कहर

Yogi Adityanath: मोदी तिसऱ्यांदा PM झाल्यास 6 महिन्यात POK भारताच्या ताब्यात असेल, योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT