How to reduce fatty liver Saam Tv
लाईफस्टाईल

How to reduce fatty liver : मद्यपानाचे सेवन करताय ? यकृताच्या आरोग्याला त्रास होतोय ? या पदार्थांचे सेवन करा

यकृताची काळजी कशी घ्याल ?

कोमल दामुद्रे

How to reduce fatty liver : यकृतामध्ये चरबी जमा होणे ही बाब सामान्य आहे, परंतु त्याचे प्रमाण जास्त नसायला हवे. ज्यावेळे आपल्या यकृताचे वजन ५ ते १० टक्के पेक्षा जास्त चरबी असते, तेव्हा फॅटी लिव्हर तयार होतो. त्यामुळे यकृतात जळजळ व नुकसान होण्याचा धोका वाढतो.

फॅटी लिव्हरची कारणे काय आहेत?

फॅटी लिव्हरचे दोन प्रकार आहेत, अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर. पहिले अतिमद्यपानामुळे आणि दुसरे दारू व्यतिरिक्त इतर अनेक कारणांमुळे. फॅटी लिव्हरच्या इतर कारणांमध्ये चरबी आणि कर्बोदकांचे जास्त सेवन, मधुमेह आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे याचा त्रास जाणवतो. (How to reduce fatty liver in marathi)

फॅटी लिव्हरची लक्षणे काय आहेत?

सुरुवातील या आजारांची कोणतीही लक्षणे दिसत नाही पण काही काळानंतर मळमळ, थकवा व अस्वस्थता जाणवू लागते. या आजारांच्या लक्षणांवर सध्यातरी काही औषधोपचार नाही परंतु, आपण काही घरगुती पदार्थांचा वापर केल्यास आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो,

१. अॅपल सायडर व्हिनेगर -

Apple Cider Vinegar

फॅटी यकृत रोगासाठी सर्वात प्रभावी घरगुती उपाय म्हणजे अॅपल सायडर व्हिनेगर. यकृतामध्ये साठलेली चरबी कमी करून वजन कमी करण्यात मदत होते. हे जळजळ कमी करून यकृताच्या निरोगी कार्यास प्रोत्साहन देते.

२. लिंबू-

Lemon

लिंबामध्ये जीवनसत्त्व (Vitamins) क आणि अँटीऑक्सिडंट्स समृद्ध असतात जे यकृताला ग्लूटाथिओन तयार करण्यास मदत करतात. यातील एंझाइम यकृतातील विषारी पदार्थांना बाहेर काढण्यास मदत करते. त्यासाठी याचे सेवन करायला हवे.

३. ग्रीन टी -

Green Tea

ग्रीन टीमध्ये कॅटेचिन असतात, जे यकृताचे कार्य सुधारतात. नॉन-अल्कोहोलिक यकृत रोग असलेल्या लोकांमध्ये चरबी जमा होण्यास प्रतिबंध करतात. हे यकृतामध्ये चरबी जमा होण्यास प्रतिबंध करते आणि त्याचे कार्य सुधारते.

४. हळदी -

Turmeric

हळदीमध्ये (Turmeric) अँटिऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहे. जे नैसर्गिकरित्या फॅटी यकृत रोगावर उपचार करू शकतात. हळद आपल्या शरीराची चरबी पचवण्याची क्षमता सुधारते आणि ती यकृतामध्ये जमा होण्यापासून रोखते.

५. पपई -

Papaya

फॅटी यकृत रोगाचे मुख्य कारण म्हणजे चरबीयुक्त पदार्थांचे सेवन. आयुर्वेदानुसार, पपई आणि त्याच्या बिया दोन्ही शरीरातील चरबी कमी करण्यास फायदेशीर ठरतात. ज्यामुळे फॅटी यकृत रोग नैसर्गिकरित्या प्रतिबंधित करतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain : राज्यात मान्सूनला निरोपाला कधी? परतीच्या पावसाची तारीख आली समोर

Maharashtra Dasara Melava Live Update : संघाला १०० वर्षे, सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार?

Mhada Homes: मुंबईत म्हाडाची घरे महागली! ठाणे, पनवेल, पालघर परिसरात ३५० हेक्टर जमीन उपलब्ध करण्याची मागणी

New Expressway : नागपूरमधून आणखी एक एक्सप्रेस वे जाणार, फडणवीस सरकारने दिली मान्यता

Arvind Srinivas: फक्त ३१व्या वर्षी तब्बल २१,१९० कोटींचा मालक, कोण आहेत अरविंद श्रिनिवास?

SCROLL FOR NEXT