saam tv
लाईफस्टाईल

Constipation: सकाळी लवकर पाणी प्यायल्याने पोट साफ होतं, तथ्य की खोटं? काय म्हणतात एक्सपर्ट

Constipation Relief Tips: सकाळी लवकर पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो का? उत्तम पचन आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी काय उपाय केले पाहिजे ते जाणून घ्या.

Bharat Jadhav

  • सकाळी पाणी पिणे पचनासाठी उपयुक्त ठरू शकते

  • बद्धकोष्ठतेचे मुख्य कारण म्हणजे पाणी व फायबरची कमतरता

  • १-२ ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय फायदेशीर

पोट साफ होत नसेल तर अनेकजण सकाळी पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण सकाळी झोपेतून लवकर उठल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यानं पोट साफ होण्यास मदत होते का, या दाव्यात किती तथ्य आहे? याचा थेट संबंध पचनसंस्थेशी आहे का? दरम्यान बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे, जी तेव्हा उद्भवते जेव्हा शौच कडक होते आणि ते बाहेर टाकण्यास त्रास होत असतो.

बहुतेक लोकांना आयुष्यात कधी ना कधी या समस्येचा सामना करावा लागतो. बहुतेकदा, शरीरातील पाण्याची कमतरता आणि फायबरच्या अभावामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्धवत असते. सकाळी पाणी प्यायल्याने ही समस्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकते.

पाणी प्यायल्याने प्रेशर निर्माण होतो का?

एपेकवॉटरच्या (Apecwater) एका अहवालानुसार, सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने तुमची आतड्या सक्रिय होतात. वैद्यकीय भाषेत याला 'गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स' (gastrocolic reflex) म्हणतात, ज्यामुळे अन्न किंवा पाणी पोटात जाताच मोठ्या आतड्याची क्रिया वेगवान होते. यामुळेच अनेक लोकांना सकाळी पाणी प्यायल्यानंतर शौचास जाण्याची इच्छा होते. पचनक्रिया समजून घेण्यासाठी, जेव्हा अन्न लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात पोहोचते,

तेव्हापर्यंत त्यातील पोषक तत्वे आधीच वेगळी निघाली असतात. मोठ्या आतड्याचे काम म्हणजे उरलेल्या पदार्थांमधून पाणी शोषून घेणे आणि त्याचे घट्ट विष्ठेमध्ये रूपांतर करणे. जर शरीरात पाण्याची कमतरता असेल, तर आतडे जास्त पाणी शोषून घेते, ज्यामुळे विष्ठा कठीण आणि कोरडी होते, आणि बद्धकोष्ठतेचा धोका वाढत असतो.

शरीरात पाणी एक महत्त्वाची भूमिका बजावते. पुरेसे पाणी प्यायल्याने शौच ओलसर राहण्यास मदत होते, ज्यामुळे ते मऊ होऊन सहज बाहेर पडते. म्हणूनच असे म्हटले जाते की पाणी बद्धकोष्ठता कमी करण्यास मदत करते. मात्र, केवळ पाणी पिणे पुरेसे नाही. जर तुम्ही पुरेसे फायबर सेवन केले नाही, तर पाण्याचे परिणाम मर्यादित होऊ शकतात.

चांगल्या फायद्यासाठी फळे, भाज्या आणि फायबरने समृद्ध असलेल्या आहारासोबत पाणी पिणे महत्त्वाचे आहे. तज्ञांच्या मते, जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर तुम्ही दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी प्यायला पाहिजे. काही प्रकरणांमध्ये, यापेक्षा जास्त पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: मुलीने रिझल्टवर खाडाखोड केली, रागाच्या भरात वडिलांकडून हत्या; लाकूड कापायच्या मशीनने वार करत जागीच संपवलं

Maharashtra Tourism : सात टेकड्यांच्या कुशीतलं महाराष्ट्रातील निसर्गरम्य शहर, उन्हाळ्यात भरते काश्मीरसारखी हुडहुडी

Maharashtra News Live Update: नासरसापूर बालिका अत्याचार प्रकरणी येवल्यात निषेध

Wednesday Horoscope: जुने वाद विसरा, ५ राशींना आरोग्य जपण्याचा सल्ला; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Famous Director Death: प्रसिद्ध दिग्दर्शकाचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, सिनेविश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT