आज गुरुवार आहे आणि आजचा दिवस भगवान विष्णु यांना समर्पित केला गेला आहे. या दिवसाची सुरुवात गुरु देव बृहस्पतिपासून होते. या दिवशी भगवान विष्णू आणि गुरु ग्रहाची पूजा केल्याने शुभ फळं मिळतं अशी मान्यता आहे. जीवनातील अनेक समस्या आणि त्रासांपासून मुक्तता मिळवण्यासाठी जर तुम्ही गुरुवारी घेतलेले उपाय पाळले तर चांगले परिणाम दिसून येतील. आजच्या गुरुवारी काय उपाय करायचे ते जाणून घेऊया.
बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी गुरुवारी स्नान करा, स्वच्छ कपडे घाला, गुरु ग्रहाचे ध्यान करा आणि मंत्रांचा जप करा. हा मंत्र आहे - 'ओम ऐं क्लीम बृहस्पतये नमः'. यावेळी २१ वेळा या मंत्राचा जप केल्याने ज्ञान आणि बौद्धिक क्षमता वाढू लागते.
जर व्यवसायामध्ये तुम्हाला मनाप्रमाणे नफा मिळत नसेल तर गुरुवारी पूजेदरम्यान भगवान विष्णूला चंदनाचा टिळा लावावा. चंदनाच्या सुगंधित अगरबत्ती देखील यावेळी तुम्ही लावू शकता. यामुळे व्यवसाय लवकरच तुम्हाला चांगला पैसा देईल.
जर तुम्हाला तुमच्या मुलांकडून त्रास होत असेल तर तर गुरुवारी एक नवीन पिवळा रंगाचा कापड घ्या आणि तुमच्या मुलाला तो स्पर्श करायला लावा. आता हे कापड भगवान विष्णूच्या मंदिरात अर्पण करा. यावेळी मंत्र ओम क्लीम बृहस्पतये नमः या मंत्राचा ११ वेळा जप करा.
जर तुम्ही आयुष्यात वाईट काळातून जात असाल तर गुरुवारी भगवान विष्णूची पूजा करा आणि पाच गोमती चक्रं घेऊन त्यांना भगवान विष्णूसमोर ठेवा. आता अगरबत्ती आणि दिव्यांनी परमेश्वराची पूजा केल्यानंतर, गोमती चक्र घ्या आणि ते पिवळ्या कापडात बांधा आणि जवळ ठेवा. हा उपाय केल्याने जीवनातील अडथळे दूर होतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.