Winter High BP Symptoms  Saam Tv
लाईफस्टाईल

Winter Hypertension : हिवाळ्यात सतत बीपी वाढतोय? याकडे दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

लठ्ठपणा, तणाव आणि खाण्याच्या विकारांमुळे उच्च रक्तदाबाची समस्या वेगाने वाढत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

High BP Symptoms : सध्याच्या जगात आजार तसे अनेक आहेत पण सर्वाधिक समस्या ही बीपीची अर्थात हाय ब्लड प्रेशरची आहेत. बीपी म्हणजे उच्च रक्तदाब होय. कारण या आजाराची काही विशेष लक्षणेच नाहीत.

लठ्ठपणा, तणाव आणि खाण्याच्या विकारांमुळे उच्च रक्तदाबाची (Blood Presure) समस्या वेगाने वाढत आहे. ही समस्या वेळीच गांभीर्याने घेतली नाही तर हृदयविकाराचा झटका येण्याचेही कारण बनू शकते. धाप लागणे, अस्वस्थता ही हाय बीपीची प्रमुख लक्षणं (Symptoms) असली, तरी बीपी वाढल्यावर आपल्या शरीरात आणखीही काही लक्षणे दिसतात.

त्यामुळे त्यांना जाणून घेणे आणि समजून घेणे महत्त्वाचे आहे जेणेकरुन तुम्हाला उच्च रक्तदाबामुळे होणाऱ्या इतर धोक्यांची वेळीच जाणीव होऊ शकेल. आज आपण याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

उच्च रक्तदाबाच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका -

1. नाकातून रक्तस्त्राव -

नाकातून रक्तस्त्राव होण्याच्या समस्येला लोक हलकेच घेतात परंतु त्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयाची विफलता यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तुम्हाला ही समस्या वारंवार येत असेल तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

2. डोकेदुखी -

उच्च रक्तदाबाच्या लक्षणांमध्ये डोकेदुखीचाही समावेश होतो. प्रथम हे दुखणे डोक्याच्या एका भागात सुरू होते आणि हळूहळू संपूर्ण डोके दुखू लागते. त्यामुळे याकडेही दुर्लक्ष करण्याची चूक आरोग्याला जड ठरू शकते. यासोबतच छातीत दुखत असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल तर उशीर न करता डॉक्टरांकडे जावे.

3. अंधुक दृष्टी -

वयानुसार दृष्टी कमी होणे किंवा मोबाईल, लॅपटॉपचा अतिवापर याला आपण अनेकदा जोडतो. पण तुम्हाला माहित आहे का की हा त्रास हाय बीपीमुळे देखील होऊ शकतो? वास्तविक, डोळ्यांमध्ये अनेक लहान रक्तवाहिन्या असतात. त्यामुळे जेव्हा बीपी जास्त असतो तेव्हा ते या रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवते. त्यामुळे स्पष्ट दृष्टी येण्याऐवजी अंधुक दिसण्याची समस्या निर्माण होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

SCROLL FOR NEXT