Russia Ukraine War Saam TV
लाईफस्टाईल

रशियात कंडोमची विक्री 170 टक्क्यांनी वाढली, कारण ऐकून थक्क व्हाल...

कंडोमच्या विक्री बरोबरच किमतीमध्येही वाढ झाली आहे. कंडोम निर्मात्या प्रमुख कंपन्यांनी ही वाढ केली आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेनमधील (Russia-Ukraine War) युद्धाचा जगभरातील आर्थिक घडामोडींवर काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. परंतु रशियामधून एक बातमी धक्कादायक बातमी समोर आली आहे. रशियामध्ये कंडोमच्या विक्रीत 170 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. ब्रिटनमधील एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार ही माहिती समोर आली आहे. युद्धाजन्य परिस्थीत रशियामध्ये कंडोमच्या विक्रीत वाढ कशामुळे झाली हे जाणून घेऊया. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिका आणि अनेक पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक प्रकारचे आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियामध्ये अनेक गोष्टींचा तुटवडा जाणवत आहे.

पाश्चात्य देशांच्या निर्बंधांमुळे देशातील कंडोमच्या किमतीत लक्षणीय वाढ होऊ शकते आणि इतकेच नाही तर कंडोमचा तुटवडा निर्माण होऊ शकतो असे सांगण्यात आले होते. सध्या रशियात कंडोम निर्मात्या कंपन्या जसे की Durex, Reckitt यांनी देशातील आपलं उत्पादन सुरु ठेवले आहे. रशियातील सर्वात मोठ्या ऑनलाइन प्रोडक्ट विक्रेत्या Wildberries ने म्हटले आहे की, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी मार्चच्या पहिल्या दोन महिन्यांत कंडोमच्या विक्रीत 170 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे.

देशातील सर्वात मोठी फार्मसी चेन असलेल्या 36.6 PJSC च्या विक्रीत 26 टक्के वाढ झाल्याचे म्हटले आहे. RBC च्या अहवालानुसार केमिस्टकडून कंडोमची विक्री गेल्या वर्षीच्या तुलनेत 32 टक्क्यांनी वाढली आहे. त्याचबरोबर सुपरमार्केटच्या सर्वेनुसार कंडोमच्या विक्रीत 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्रीझरवाटिव्हनाया सेक्स शॉपच्या सह-मालक येसेनिया शमोनिना यांनी सांगितले की, "लोक कंडोमची साठवण करुन ठेवत आहेत. त्यामुळे परिणामी आम्हाला कंडोमच्या किंमतीमध्ये वाढ करावी लागली आहे. त्यांनी सांगितले की विविध ब्रँडची उत्पादने 50 टक्क्यांनी महाग झाली आहेत. याचे कारण असे की प्रमुख पाश्चात्य चलनांच्या तुलनेत रुबल हे चलन कमकुवत झाल्यानंतर, आउटलेट्सना किमतीत वाढ करावी लागली आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT