Colorectal Cancer  google
लाईफस्टाईल

Colorectal Cancer ठरतोय ५० वर्षांखालील पुरुषांचा मृत्यूचं कारण; वेळीच लक्षणे घ्या जाणून; अमेरिकेतील तज्ज्ञांनी काय सल्ला दिला?

Colon Cancer Symptoms: ५० वर्षांखालील पुरुषांमध्ये आतड्यांचा कॅन्सर झपाट्याने वाढतोय. लक्षणांकडे दुर्लक्ष, चुकीची जीवनशैली आणि उशिरा तपासणी यामुळे मृत्यूचा धोका वाढत आहे.

Sakshi Sunil Jadhav

धकाधकीच्या जीवनात सर्दी-खोकल्या सारख्या समस्यांना अनेक जण दुर्लक्षिक करतात. १२ तास काम करुनही काही लोक पुरेशी झोप घेत नाहीत. काहीजण कामानिमित्त घराबाहेर असल्याने फक्त जंक फूड, स्ट्रीट फूड खाणं पसंत करतात. काहीजण लाइफस्टाइलनुसार दारु, सिगारेटचे सेवन करतात. यामुळे कमी वयातच त्यांना जीवघेण्या समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामध्ये कॅन्सरसारख्या समस्यांमुळे मोठ्या प्रमाणात मृत्यू होत आहेत.

अमेरिकेत ५० वर्षांखालील पुरुषांना या आजारामुळे जीव गमवावा लागला आहे. तो आजार म्हणजे आतड्यांचा कॅन्सर (Colorectal cancer) हा आहे. पुढे आपण हा आजार कसा होतो? व्यसन नसतानाही हा आजार होतो का? आणि वयोगटाबद्दल जाणून घेणार आहोत.

आतड्यांचा कॅन्सर कसा होतो?

आतड्यांच्या आतील आवरणातील पेशींमध्ये जनुकीय बदल होतात. या पेशी नियंत्रणाबाहेर वाढू लागतात आणि पॉलिप्स तयार होतात. काही पॉलिप्स कालांतराने कॅन्सरमध्ये बदलतात. पूर्वी हा कॅन्सर प्रामुख्याने ५० नंतर दिसत होता. पण आता ३० ते ४० वयोगटातही त्याचे प्रमाण वाढत आहे. याची लक्षणे म्हणजे शौच्यावाटे रक्त येणे, सतत पोटदुखी / गॅसचा त्रास, अचानक वजन कमी होणे, वारंवार जुलाब किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होणे आणि सतत थकवा ही आहेत.

अभ्यासानुसार, ५० वर्षांखालील अमेरिकन नागरिकांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरमुळे होणारे मृत्यू दरवर्षी सरासरी १ टक्क्यांहून जास्त प्रमाणात वाढले आहेत. पुरुष आणि महिलांचा एकत्रित विचार करता हा कॅन्सर या वयोगटातील मृत्यूंचं प्रमुख कारण ठरला आहे. याउलट, ल्युकेमिया आणि स्तन कॅन्सरसारख्या इतर रोगांमुळे होणारे मृत्यू दरवर्षी ६ टक्क्यांपर्यंत घटले आहेत.

चांगल्या औषधोपचारांमुळे अनेक रुग्ण जास्त काळ जगत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तंबाखू सेवनात घट झाल्याने फुफ्फुसाच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये दरवर्षी सुमारे ५.७ टक्क्यांची घट झाली आहे. एकेकाळी पहिल्या क्रमांकावर असलेला फुफ्फुसाचा कर्करोग आता चौथ्या क्रमांकावर गेला आहे.

सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे ४० वयोगटातील अनेक व्यक्तींना नियमित तपासणीचा सल्ला दिला जात नाही. परिणामी, ७५ टक्क्यांहून जास्त तरुण रुग्णांमध्ये हा कॅन्सर उशिरा म्हणजे प्रगत अवस्थेत आढळतो. त्यामुळे लवकर तपासणी आणि लक्षणांकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रजासत्ताक दिनाची जय्यत तयारी सुरू असताना घातपाताचा कट उधळला; 'जैश'च्या दहशतवाद्याला कंठस्नान

Saturday Horoscope: गुंतवणुकीचा होईल फायदा, 4 राशींना होणार आर्थिक लाभ; वाचा शनिवारचे राशीभविष्य

आज बाळासाहेब नाहीयेत ते बरं आहे; राज ठाकरे असे का म्हणाले? VIDEO

मुंबईत महिला ग्राहकावर हल्ला, अर्बन कंपनी थेरपिस्टचा व्हिडिओ व्हायरल, धक्कादायक कारण समोर

Maharashtra Live News Update: बाळासाहेबांबद्दल आम्ही तासंतास बोलू शकतो- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT