Sakshi Sunil Jadhav
अनेकांना लांब लांब फिरण्याची खूप जास्त इच्छा असते. पण वेळेमुळे किंवा बजेटमुळे त्यांना फिरता येत नाही.
पुढे आपण कमी पैशात आणि महाराष्ट्रातच मिनी मालदीवचा अनुभव घेणार आहोत. पुढे आपण असं दिसणारं ठिकाण कुठे आहे? याबद्दल जाणून घेणार आहोत.
मंडळी महाराष्ट्रात तुम्हाला मालदीव पाहायचे असेल तर तारकर्ली बीच एकदा नक्की पाहा.
तुम्हा तारकर्ली येथे स्वच्छ आणि निळसर समुद्राचे दर्शन घडेल. पाढंरी शुभ्र वाळूसुद्धा पर्यटकांना पाहायला मिळेल.
तुम्हाला खूप धमाल करायची असेल तर स्कुबा डायव्हिंग हा पर्याय तुम्हाला मिळेल. तसेच पाण्यात रंगीबेरंगी मासे पाहायला मिळतील.
हाऊसबोट आणि बोटिंगचा अनुभव तुम्हाला या बीचवर घेता येईल. त्यासाठी करळी नदीच्या मुखाशी तुम्हाला जावे लागेल.
तुम्हाला विकेंडला बायको किंवा गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचं असेल तर तारकर्लीजवळ भेळ खात सुंदर निसर्गरम्य सूर्योदय किंवा सुर्यास्त तुम्ही पाहू शकता.
तुम्हाला लहान मुलांना वाळूत खेळायला पाठवायचे असेल तर तुम्ही या समुद्राला भेट देऊ शकता. हे सुरक्षित ठिकाण आहे.
कोकण म्हंटल्यावर तुम्हाला अस्सल मालवणी पदार्थांची चव चाखायला या ठिकाणी नक्कीच मिळेल.