Coffee Drinking Tips Before And After Gym  
लाईफस्टाईल

Coffee Drinking Tips Before And After Gym: जिमआधी की जिमनंतर, कॉफी कधी प्यावी? जाणून घ्या

Coffee Drinking Tips: जिमला जाण्यापूर्वी की नंतर ब्लॅक कॉफी प्यावी? वर्कआउटसाठी कॅफीनचे फायदे, कॉफी पिण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत सविस्तर जाणून घ्या.

Manasvi Choudhary

आजकाल जिमला जाणाऱ्या व्यक्ती आहाराकडे विशेष लक्ष देतात. जिमला जाण्याआधी आणि जिमनंतर नेमकं काय खावे याकडे लक्ष देतात. अनेकजण जिममध्ये जाण्यापूर्वी ब्लॅक कॉफी पितात तर काहीजण व्यायामानंतर ब्लॅक कॉफी पितात. पंरतु, कॉफी पिण्याची योग्य पद्धत कोणती योग्य आहे. ते सविस्तरपणे जाणून घ्या.

ब्लॅक कॉफीमध्ये कॅफिन असते ज्याचा परिणाम आरोग्यावर होतो. कॉफीमधील कॅफिन व्यायामादरम्यान कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते. याशिवाय तुम्ही व्यायामानंतर देखील कॉफी पिऊ शकतात.

कॉफीमधील कॅफिन हे मज्जासंस्थेवर परिणाम करते जे थकवा कमी करते आणि व्यायाम करण्यासाठी ऊर्जा देते.

जर तुम्ही ट्रेडमिलवर धावत असाल, सायकल चालवत असाल किंवा बराच वेळ कार्डिओ करत असाल, तर कॅफीनमुळे तुमचा थकवा कमी होण्यास मदत होऊ शकते. पण याचा अर्थ असा नाही की कॉफी प्यायल्याने लगेच अतिरिक्त ऊर्जा मिळते किंवा तुमच्या स्नायूंची क्षमता वाढते. कॉफीमध्ये साखर किंवा दूध घातल्याने तिच्या कॅलरी आणि पौष्टिक घटकांमध्येही बदल होतो.

व्यायामापूर्वी कॅफीन घेण्याची योग्य वेळ कोणती?

तुम्हाला जर व्यायामापूर्वी कॉफी प्यायची असेल तर वेळ अत्यंत महत्वाची आहे. व्यायामाच्या साधारण ३० ते ६० मिनिटे आधी तुम्ही कॅफिनचे सेवन करणे महत्वाचे आहे. व्यायामाच्या साधारण ६० मिनिटे आधी तुम्ही कॉफी पिणे योग्य वेळ मानली जाते.

परंतु ही वेळ प्रत्येकासाठी सारखी असू शकते असे नाही कारण तुम्ही कॅफिनचे सेवन किती प्रमाणात कोणत्या वेळी करता हे देखील महत्वाचे आहे. तुमचे शरीर कॅफीनवर किती वेगाने प्रक्रिया करते यावर अवलंबून असते.

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Cigarette Smoking: सिगारेट ओढल्यामुळे ओठांचा रंग का बदलतो?

Student Allowance Hike: विद्यार्थ्यांना दिवाळीत मोठं गिफ्ट, सरकारकडून निर्वाह भत्त्यात मोठी वाढ; किती रुपये दिले जाणार?

Maharashtra News Live Update: मुंबई- नाशिक महामार्गावर कारने घेतला पेट

FDA Action: बाबा रामदेव यांच्या पतंजलीवर तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; गायीचे 2,279.7 लीटर तूप जप्त

कितीही थकीत असो ई-चलान, आता मिळणार २० टक्क्यांपर्यंत सूट; सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT