White Clothes Cleaning Hacks Saam Tv
लाईफस्टाईल

Cleaning Hacks : साडीला तेलाचे-तिखटाचे डाग लागले? कितीही घासले तरी निघत नाही, या सोप्या टिप्स वापरा

Clean Clothes : सिल्कच्या साडीवर डाग पडल्यास संपूर्ण मूड खराब होतो. अशावेळी ही सोपी टिप्स येईल कामी.

कोमल दामुद्रे

How To Remove Stain :

सण-समारंभ आले की, स्त्रिया पांरपारिक लुक परिधान करतात. घरी पूजा किंवा लग्नसमारंभ असले की साडी नेसतो. सिल्कची साडी दिसायला खूप सुंदर असते आणि खूप महाग असते, त्यामुळे सिल्कच्या साडीवर डाग पडल्यास संपूर्ण मूड खराब होतो.

आपण लग्नसमारंभात सिल्कच्या साड्या नेसतो तेव्हा त्यावर अनेकदा डाग पडतात. बरेचदा जेवण बनवताना तेलाचे किंवा तिखटाचे डाग साडीला लागतात त्यामुळे आपण चिंतेत पडतो.

महागडी साडी विकत घेतली तर खरी पण त्यावर असणारे डाग हे सहसा जात नाही. यामुळे आपले पैसे वाया गेले का हा प्रश्न तुम्हालाही सतावत असेल तर घाबरु नका.सिल्कच्या साडीवरील डाग काढण्यासाठी बहुतेकदा आपण ड्राय क्लीनिंगचा पर्याय निवडतो, परंतु जर सोप्या पद्धतीने साडीवरचे डाग काढायचे असतील तर या टिप्स फॉलो करा

साडीवरील डाग काढण्यासाठी सर्वप्रथम बादलीत पाणी घेऊन त्यात डिटर्जंट घाला त्यानंतर २ चमचे ग्लिसरीन देखील घाला. त्यानंतर साडीचा रंग निघतोय का पाहा.

कोमट पाण्यात साडी (saree) काही वेळ भिजत घाला. त्यानंतर थंड पाण्याने धुवा. यादरम्यान साडीला अधिक प्रमाणात घासू नका.

साडी नीट धूवुन झाल्यावर ती जास्त घासली जाणार नाही याची काळजी घ्या, साडीला न पिळता ती वाळवा.

तसेच तेलाचा आणि तिखटाचा डाग काढायचा असेल तर बेबी पावडरचाही वापर करु शकतो. यासाठी डाग पडलेल्या ठिकाणी बेबी पावडर लावा. १५ ते २० मिनिटे तसेच राहू द्या. नंतर त्याजागी साबण लावून ब्रश घासा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Fort Heist : राजधानीत सुरक्षेचा चिंधड्या, किल्ल्यामधून १ कोटींच्या सोन्याचा कलश चोरीला

Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

आजारपणामुळे मोठ्या भावाचा मृत्यू, निधनाचे वृत्त कळाताच धाकट्याने जागीच सोडलं प्राण; संपूर्ण गावावर शोककळा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

Maharashtra Live News Update: फडणवीस कुटुंबीयांकडून अनंत चतुर्दशीनिमित्त पूजा

SCROLL FOR NEXT