Benefits Of Cinnamon  Saam Tv
लाईफस्टाईल

Benefits Of Cinnamon : मधूमेहाच्या आजारावर गुणकारी ठरेल दालचिनी, जाणून घ्या इतर अनेक फायदे

वेगवेगळ्या चमचमीत पदार्थाच्या माध्यमातून दालचिनी आपल्या पोटात जात असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Benefits Of Cinnamon : वेगवेगळ्या चमचमीत पदार्थाच्या माध्यमातून दालचिनी आपल्या पोटात जात असते. पण ही दालचीन नुसतीच पदार्थाची चव वाढवत नाही तर ते आरोग्यासाठीही वरदान आहेत. अनेक आजारांवर दालचिनी गुणकारी आहे. म्हणून डॉक्टरसुद्धा दालचिनी खाण्याचा सल्ला देतात.

हृदयविकारावर नियंत्रण ठेवते -

ह्रदयविकारावर दालचिनी अत्यंत गुणकारी आहे. दालचिनीमुळे तुमचा रक्त (Blood) पुरवठा सुरळीत होतो. त्यामुळे दिवसातून एकदा तरी तुमच्या जेवणात दालचिनी असू द्या. त्यामुळे ह्रदयविकार नियंत्रणात राहते

डायबिटीस नियंत्रणात ठेवते -

शरीरातील साखर नियंत्रणात ठेवण्याचे कामही दालचिनी करत असते. त्यामुळे डायबिटीझमधील दुसऱ्या प्रकारात इन्सुलिन नियंत्रणात ठेवण्याचे काम दालचिनी करते. त्यामुळे नित्य सेवनात असावी.

वजन ठेवते नियंत्रणात -

महिलांच्या आयुष्यात अनेक शारिरीक बदल होत असतात. शारिरीक बदलांमुळे वजन कमी जास्त होत असते. तुमचेही वजन असंतुलित झाले असेल तर तुमच्या वजनाला नियंत्रित ठेवण्याचे कामही दालचिनी करते.

जर तुम्हाला वजन (Weight) नियंत्रणात आणायचे असेल तर दालचिनी चहा करुन प्या. 1 कप गरम पाण्यात दालचिनी पावडर घालून ते पाणी 30 मिनिटे तसेच ठेवा. पाणी थंड झाल्यानंतर त्यात एक चमचा मध घाला. (गरम पाण्यात मध घालू नका. कारण त्यातील चांगले घटक कमी होतील) हे पाणी रोज प्या तुमचे वजन कमी होईल.

डोळ्याच्या विकारावर गुणकारी -

डोळे कोरडे पडणे, शुष्क वाटणे असे त्रास तुम्हाला होत असतीलत तर तुम्ही आवर्जून दालचिनीचे सेवन करायला हवे. दालचिनीच्या सेवनाने हे त्रास कमी होतील. दालचिनी चहाच्या रोजच्या सेवनाने तुमच्या डोळ्यांचे विकार कमी होईल.

जर तुम्हाला PCOS ची तक्रार असेल तर त्यावरही दालचिनी उपयुक्त आहे. PCOS मध्ये अनेकदा पोटदुखीचा त्रास होतो. दालचिनीच्या नित्य सेवनाने तुम्हाला PCOS मुळे होणारा त्रास कमी होईल

बॅक्टेरियाला दूर ठेवते -

दालचिनीमधील अँटीबॅक्टेरीअल गुणधर्म असतात. ते तुम्हाला बॅक्टेरियापासून दूर ठेवतात. हे आम्ही नाही तर एका रिसर्चमध्येसमोर आले आहे.

डोकेदुखी आणि अंगदुखी ठेवते दूर -

दालचिनीमुळे तुमची डोकेदुखी आणि अंगदुखीदेखील कमी होण्यास मदत होते. तुम्हाला दालचिनी पावडरची पेस्ट तयार करुन तुम्हाला तुमच्या डोक्याला लावून ठेवायची आहे. साधारण 30 मिनिटे तुम्हाला ही पेस्ट डोक्याला लावून ठेवायची आहे.

तुम्हाला ही पेस्ट लावल्यानंतर थोडे जळजळल्यासारखे वाटेल. पण ही पेस्ट काढून टाकल्यानंतर तुमची डोकेदुखी थांबेल अगदी त्याचप्रमाणे तुम्हाला अंग दुखत असेल तर अशीच पेस्ट करुन तुमच्या दुखणाऱ्या भागावर लावायची आहे.

दालचिनीमध्ये प्रामुख्याने थाईमीन, फॉस्फरस, प्रोटीन, सोडियम, व्हिटमीन, कॅल्शियम, मँगनीज, पोटॅशिअम, निआसीन, कार्बोहायड्रेट इ. महत्त्वपूर्ण तत्त्व आढळतात. ज्यामुळे दालचिनी चवीला थोडी गोड आणि तिखट असते. पदार्थांची चव वाढवण्यासोबतच दालचिनीही कफ निगडीत रोगांनाही दूर करण्यात उपयोगी पडते. त्यामुळे हिचा वापर अनेक औषधींमध्ये केला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT