Cinnamon And Bay Leaf  Saam Tv
लाईफस्टाईल

Cinnamon And Bay Leaf : तमालपत्र आणि दालचिनीचा चहा प्यायल्याने काय होते? जाणून घ्या शरीराला होणारे फायदे

Cinnamon and bay leaf good for health : वजन कमी करण्यासाठी किंवा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकजण दालचिनी आणि तमालपत्राचा चहा पितात. नियमितपणे हा चहा प्यायल्याने वजन खरेच कमी होते का? हा प्रश्न अनेकांना पडतो.

कोमल दामुद्रे

Cinnamon And Bay Leaf Benefits :

वजन कमी करण्यासाठी किंवा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकजण दालचिनी आणि तमालपत्राचा चहा पितात. नियमितपणे हा चहा प्यायल्याने वजन खरेच कमी होते का? हा प्रश्न अनेकांना पडतो.

परंतु, यात असणारे गुणधर्म तुमचे अनेक आजारांपासून (Disease) रक्षण करतात. दालचिनी आणि तमालपत्र दोन्ही बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटीव्हायरल गुणधर्मांनी समृद्ध आहेत. यामुळे तुमचा चयापचय दर वाढविण्यात मदत करतात. जाणून घेऊया चहा पिण्याचे फायदे (Benefits).

1. साखर नियंत्रणात राहाते

तमालपत्र आणि दालचिनीचा चहा इंसुलिन सुधारते तसेच साखर चयापचय गतिमान करते. यामुळे पचनाचा वेग सुधारतो. यामुळे रक्तातील साखरेची समस्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

2. जळजळ कमी होते

तमालपत्र आणि दालचिनीचा चहा प्यायल्याने शरीरातील जळजळ कमी होते. तसेच रक्त परिसंचण सुधारते. या दोन्हीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. ज्यामुळे शरीराची सूज देखील कमी होते. याशिवाय दोघांमधील विशेष संयुगे शरीरात जळजळ होणाऱ्या पेशींना शांत करतात.

3. रोगप्रतिकारशक्ती वाढते

तमालपात्र आणि दालचिनी चहा रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. चहा शरीरातील खराब डिटॉक्स बाहेर फेकते. शरीराच्या कार्यामध्ये संतुलन राखण्यासही मदत करतो. याशिवाय रोगप्रतिकारक पेशी वाढवते. सर्दी-खोकल्यासारख्या समस्यांवरही फायदेशीर आहे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुकानात मिळणारी 'नानखटाई' घरी कशी बनवायची?| Homemade Nankhatai Recipe

संजय पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, नक्की काय म्हणाले?

Mirzapur The Movie: गुड्डू पंडित आणि कालीन भैय्याचा भौकाल; मिर्झापूरमध्ये पुन्हा रंगणार रक्तरंजीत थरार

Chhatrapati Sambhajinagar tourism: धबधबा, हिरवळ आणि धुक्याची चादर; छत्रपती संभाजीनगरमध्ये या ५ ठिकाणी पावसाळ्यात फिरायला जा

Maharashtra News Live Update: स्मार्ट मीटर सक्ती विरोधात ढाणकीत सर्वपक्षीय नेत्यांचे रस्तारोको आंदोलन

SCROLL FOR NEXT