cholesterol lowering drugs google
लाईफस्टाईल

Cholesterol Health: कोलेस्ट्रॉल कमी करणारी औषधं सुरक्षित आहेत का? तज्ज्ञांनी दिली धक्कादायक माहिती

Heart Care: कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधे सुरक्षित आहेत का? तज्ज्ञांच्या मते योग्य सल्ल्याने घेतलेली औषधे हृदयविकाराचा धोका कमी करून आरोग्य टिकवण्यास मदत करतात.

Sakshi Sunil Jadhav

बदलत्या हवामानुसार शरीरावरही परिणाम होत असतात. त्यामुळे आपण साध्या सर्दी-खोकला, ताप अशा आजारांवर औषधं घेतो. पण त्या औषधांनी तुमच्या शरीरावर परिणाम झाला नाही तर? काही वेळेस काहींना नव्या डॉक्टरांकडून घेतलेल्या गोळ्यांनी आराम येत नाही. अशा वेळेस तुम्ही त्या गोळ्या खाणं थांबवलं पाहिजे. तर पुन्हा तपासणी करुन त्यावर उपचार केले पाहिजे. कारण या सामान्य समस्या सोडल्यास इतर जीवघेण्या आजारांच्या गोळ्या काहींच्या शरीराला सूट होत नाहीत.

तुम्हाला जर ३० ते ४० वयाच्या आसपास कोलेस्टेरॉलच्या समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर तुम्ही औषधांसोबत काही पत्थ पाळणं आवश्यक आहे.

पण अनेकांच्या मनात येणारा प्रश्न म्हणजे, कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधं सुरक्षित आहेत का? वाढलेले वाईट कोलेस्टेरॉल (LDL) हृदयविकार, हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढवण्यास कारणी भूत ठरतो. हेच धोके कमी करण्यासाठी डॉक्टर कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधे देतात. ही औषधे रक्ततपासणीतले आकडे सुधारत नाहीत, तर तुम्ही दीर्घकाळ हेल्दी राहावं यासाठीही प्रयत्न करतात.

जेव्हा आहार, व्यायाम आणि जीवनशैलीतले बदल करूनही कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहत नाही, तेव्हा ही औषधं खूप महत्वाची ठरतात. ज्या व्यक्तींना आधीपासूनच डायबेटीज किंवा ह्रदयविकार असतो अशा रुणांसाठी ही औषधं महत्वाची असतात. त्यामध्ये स्टॅटिन नावाची गोळी कोलेस्टेरॉल असलेल्या रुग्णांना दिली जाते. त्यासोबत इझेटिमाईब, PCSK9 इनहिबिटर्स, बाइल अॅसिड सिक्वेस्ट्रंट्स आणि फायब्रेट्स यांचाही वापर केला जातो.

तुम्ही कितीही महागडे उपचार घेतलेत आणि तुमच्या शरीरातला फॅट कमी करण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करत नसाल तर हे सगळं पाण्यात गेल्यासारखं किंवा निरर्थकअसतं. काहींना या आजारात काही वेगळ्या दुखण्यांनाही सामोरं जावं लागतं. जसं की, सांधे दुखी. हे सामान्य लक्षण सुरुवातीला लोक दुर्लक्षित करतात. पण हेच शुल्लक कारण तुम्हाला येणाऱ्या हार्ट अटॅकचे कारण असू शकते. त्यामुळे रुग्णांनी आणि वैद्यकीय सल्ल्याने औषधं घेतल्याने कोलेस्टेरॉल कमी करणारी औषधं फायदेशीर आणि सुरक्षित असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी काढला आहे.

सूचना: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. कोलेस्टेरॉल किंवा इतर कोणतीही औषधे घेण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: थलपती विजय उद्या 3.30 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

निदा खानला आश्रय देणं भोवलं; एमआयएमच्या नेत्याच्या घर आणि ऑफिसवर चालणार बुलडोझर|VIDEO

Nashik Tourism: दूर जायची गरजच नाही! नाशिकपासून फक्त २ तास अंतरावर आहे हे सुंदर हिल स्टेशन

Konkan Tourism : कोकणात मामाच्या गावाला गेलाय? मग 'हा' स्वर्गाहून सुंदर समुद्रकिनारा एकदा पाहाच

भीषण अपघाताने संसार उद्ध्वस्त; बस-दुचाकीच्या धडकेत नवरा-बायकोचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT