Sakshi Sunil Jadhav
साडी कितीही सुंदर असली तरी तिचा संपूर्ण लूक ब्लाउजवर अवलंबून असतो. जुना किंवा आउटडेटेड ब्लाउज असल्यास साडी घालण्याची इच्छाच होत नाही.
थोडीशी क्रिएटिव्हिटी आणि मॅचिंग नेट फॅब्रिक वापरून तुम्ही जुने ब्लाउज पीस सहज ट्रेंडी बनवू शकता.
शियर नेट फॅब्रिकपासून बनवलेल्या पफ स्लीव्ह्स, रफल स्लीव्ह्स किंवा हेवी एम्ब्रॉयडरी स्लीव्ह्स सध्या फॅशनमध्ये आहेत. सिंपल ब्लाउजला यामुळे मॉडर्न टच मिळतो.
बॅकलेस ब्लाउजवर मॅचिंग नेट अटॅच करून त्यावर एम्ब्रॉयडरी किंवा सिक्विन वर्क केल्यास ब्लाउज अधिक एलिगंट दिसतो.
पूर्ण नेटचा ब्लाउज आणि आत कॉन्ट्रास्ट किंवा मॅचिंग ब्रालेट इनर दिल्यास ग्लॅमरस आणि बोल्ड लूक मिळतो. कॉकटेल पार्टीसाठी हा पर्याय परफेक्ट आहे.
ब्लाउजच्या फ्रंट किंवा बॅक नेकलाइनवर शियर नेट अटॅच केल्यास ब्लाउज क्लासी आणि स्टायलिश दिसतो. शोल्डरवर नेट दिल्यास लूक आणखी उठून दिसतो.
डे फंक्शनसाठी प्लेन नेट तर लग्न किंवा पार्टीसाठी एम्ब्रॉयडरी किंवा सिक्विन वर्क असलेली नेट निवडावी.
ब्लाउजसोबत नेटचा केप अटॅच करा. हा नवा ट्रेंड आहे. हा केप जॅकेटसारखा फ्लो होतो आणि संपूर्ण लूक डिझायनर बनवतो.
महागडी साडी न घेता फक्त ब्लाउजमध्ये नेट अटॅच करून तुम्ही तुमचा पारंपरिक लूक सहज ट्रेंडी आणि मॉडर्न बनवू शकता.