जीवंत माशांच्या चायनीज भेळपुरीचा व्हिडिओ व्हायरल Twitter/@ Rupin Sharma
लाईफस्टाईल

जीवंत माशांच्या चायनीज भेळपुरीचा व्हिडिओ व्हायरल; तुम्हीही एकदा पहाच

भारतीय पोलिस सेवेचे अधिकारी रूपिन शर्मा (Rupin Sharma) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भेळपुरीचे (Bhelpuri) नुसते नाव ऐकले तरी तोंडात पाणी येते. मसालेदार किंवा चटपटीत खायची इच्छा असेल तर भेळपुरीचे नाव मनात सर्वात आधी येते. पण जर तुम्हाला चायनीज भेळपुरी (Chinese Bhelpuri) खायची का असा प्रश्न विचारला तर तुम्ही काय उत्तर द्याल. भारतात भेळपुरी प्रत्येकाला आवडते, तर दुसरीकडे आपल्या देशात चायनीज पदार्थही आवडीने खाल्ले जातात. हे आपल्या सर्वाना माहीत आहे. पण अलीकडेच चायनीज भेळपुरीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ तुम्ही पहिलं तर मात्र तुमचे भेळपुरी वरचे मन नक्की उडून जाईल. (Chinese Bhelpuri video of live fish is going viral)

सोशल मिडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ चीनमधील स्ट्रीट फूडचा आहे. भारतीय पोलिस सेवेचे अधिकारी रूपिन शर्मा (Rupin Sharma) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला असून या डिशला ‘चायनीज भेळपुरी’ असे नाव दिले आहे.

आयपीएस रुपीन शर्मा यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करताना 'कॅप्शनमध्ये हसणार्‍या इमोजीसह' भेलपुरीची चीनी आवृत्ती ',' लाइव्ह फिश पुरी’ असे लिहिले आहे. हा व्हिडिओ पहिला तर तुम्हालाही आश्चर्य आणि किळस वाटल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओमध्ये एक माणूस रस्त्यावर अन्नपदार्थांची विक्री करताना दिसत आहे. त्याच्यासमोर पाण्याचा एक मोठा डबा आहे, ज्यात शेकडो लहान मासेही दिसत आहेत.

आता तुम्ही असा विचार करत असाल की भेळपुरीत माशांचे काम काय, कोणत्याही भेळपुरीप्रमाणेच हा माणूसही यात भेळपुरी बनवताना दिसत आहे. मात्र ही साधीसुधी भेळपुरी नसून माशांची भेळपुरी आहे. हा माणूस या छोट्या माश्यांमध्ये सर्व मसाले मिसळून तो पदार्थ तयार करतो. पदार्थ तयार करताना त्यातून काही मासे उडत असल्याचे तर काही मासे भांड्यातून बाहेर पडत असल्याचेही दिसून येत आहेत.

पदार्थ तयार झाल्यानंतर ते पॅक करुन समोर उभे असलेल्या मुलीला देतो आणि व्हिडिओमध्ये मुखवटा घातलेली मुलगी तो पदार्थ चाखण्यासाथी बॉक्स उघडते. त्या पदार्थाची चव घेते आणि अतिशय घाणेरडे तोंड तयार करते. यावेळी तिच्या बॉक्स मधूनही काही मासे उड्या मारताना दिसत आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोक या व्हिडिओवर मजेदार टिप्पण्या देत आहेत.

चिनी लोकांवर भाष्य करताना एका युजरने लिहिले की, माहित नाही हे लोक अजून किती गंभीर रोग घेऊन येणार आहेत, चिंग पोकळी. तर अशाच पद्धतीने चीनने संपुर्ण जगाला कोरोना पुरी खाऊ घातली होती, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एका युजरने दिली आहे.

आता मला माहित नाही की चिंग पोकळी कोणता दुसरा नवीन रोग आणेल, नंतर एकाने एक व्यंग घेऊन लिहिले की, त्याच प्रकारे कोरोना पुरी चीनने संपूर्ण जगाला खायला दिले, ज्यांची चव नाही जीवन. संपूर्ण विसरणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मतचोरीच्या खोट्या आरोपांना निवडणूक आयोग घाबरत नाही',: मुख्य निवडणूक आयुक्त

Vaishno Devi Yatra: वैष्णो देवीची यात्रा पूर्णपणे थांबवली, भाविकांना परत जाण्याचे आवाहन; नेमकं कारण काय?

Maharashtra Live News Update: पेशवे जयंतीनिमित्त रॅली मध्ये सहभाग घेत खासदार मेधा कुलकर्णी यांनी चालवली दुचाकी

Priya Bapat: प्रिया बापटचा स्पेशल बॉसी लूक; लवकरच झळकणार नव्या भूमिका

Asia Cup 2025 : आशिया कपसाठी पाकिस्तानी संघाची घोषणा, PCB चा बाबर आझम-मोहम्मद रिझवानला धक्का

SCROLL FOR NEXT