Children's Day: 'बचपन बचाओ आंदोलन' कुणी सुरु केलं? याबद्दल माहित असायलाच हवं!
Children's Day: 'बचपन बचाओ आंदोलन' कुणी सुरु केलं? याबद्दल माहित असायलाच हवं! Saam Tv
लाईफस्टाईल

Children's Day: 'बचपन बचाओ आंदोलन' कुणी सुरु केलं? याबद्दल माहित असायलाच हवं!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुले ही देवाघरची फुले असं आपल्याकडे म्हटलं जातं. आपण लहान मुलांना अगदी फुलांप्रमाणे जपतो. आपलं लहानपण हे आपल्या आयुष्यातील सर्वात गोड दिवस असतात. बालपण निरागस आणि प्रेमळ असतं, त्यामुळे मोठे झाल्यावर लहानपणंच भारी होतं यार असं आपण म्हणतो. मात्र सर्वांचं बालपण असं छान असतं का? दुर्देवाने त्याचं उत्तर नाही असंच आहे. भारतासह जगात अशी असंख्य बालके आहेत, ज्यांना इतरांसारखं सुंदर बालपण (Childhood) मिळालंच नाही. खुप कमी वयातच त्यांना मोठ्या आव्हानांना सामोरं जावं लागलं. अशाच लहान मुलांसाठी काम करणाऱ्या एका महान भारतीयाबद्दल आपण जाणून घेणार आहोत. त्यांनी बचपन बचाओ आंदोलनाला (Bachpan Bachao Andolan) सुरुवात केली, त्यांच्या कार्याचा गौरव नोबल पुरस्काराने करण्यात आला. त्या भारतीयाचं नाव आहे, कैलाश सत्यार्थी! (Kailash Satyarthi)

(Children's Day: Who started 'Bachpan Bachao Andolan'? Must know about this indian)

हे देखील पहा -

खरंतर जागतिक बालदिन (Children's Day) हा २० नोव्हेंबरला साजरा केला जातो. पण भारतात मात्र तो १४ नोव्हेंबरला साजरा केला जातो. भारताच्या प्रदीर्घ स्वातंत्र्यलढ्यानंतरचे पहिले पंतप्रधान होते पंडित नेहरू. बालकांविषयी पंडित नेहरूंना वाटणार्‍या प्रेमाची आठवण म्हणून १४ नोव्हेंबर हा त्यांचा वाढदिवस आपल्या देशात बालदिनाच्या रूपाने साजरा केला जातो.

राष्ट्रीय असो किंवा आंतरराष्ट्रीय असो, बालदिन हा खासच आहे. प्रत्येक बालकाला त्याचं बालपण, शिक्षण, पालन-पोषण, संस्कार हे योग्य पद्धतीने मिळणं हा त्याचा मुलभुत हक्क आहे. मात्र परिस्थितीमुळे लहान वयातच अनेक बालकांना काम करावे लागते, खूप कमी वयात त्यांच्या खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी येते. अशाने त्यांचं बालपण तर हिरावतंच शिवाय, ते शिक्षणापासूनही वंचित राहिल्याने त्यांचा विकास होत नाही. अशा अनेक बाल कामगारांसाठी काम करणारे कैलाश सत्यार्थी हे एक भारतीय बालहक्क चळवळकर्ते आहेत. १९८० सालापासून बालमजूरी उच्चाटनाचे काम करणाऱ्या सत्यार्थींच्या बचपन बचाओ आंदोलन ह्या संस्थेने आजवर सुमारे ८०,००० मुलांची सक्त मजूरीमधून मुक्तता केली आहे.

१० ऑक्टोबर २०१४ रोजी सत्यार्थींना नोबेल शांतता पारितोषिक मिळाल्याचे जाहीर केले. हे पारितोषिक त्यांना पाकिस्तानच्या मलाला युसूफझाईसोबत विभागून दिले गेले. बालमजुरी हटवण्यासाठी प्रयत्न करताना त्यांच्यावर अनेक हल्ले झाले तसेच त्यांच्या दोन सहकाऱ्यांची हत्याही करण्यात आली होती, मात्र आजही त्यांचा हा लढा सुरुच आहे.१९८० मध्ये सुरु केलेले हे आंदोलन दक्षिण आशियात पसरले. आणि नंतर ते १४४ देशांत पसरून जागतिक झाले.

१९९३ मध्ये बाल मजुरांच्या प्रश्नावर व्यापक जागृती करण्यासाठी बिहार ते दिल्ली असा २००० किलोमीटर प्रचार यात्रा काढण्यात आली. १९९४ मध्ये अशीच कन्याकुमारी ते दिल्ली ५००० किलोमीटर यात्रा काढण्यात आली. १९९५ मध्ये कलकत्ता ते काठमांडू अशी दक्षिण आशियाई यात्रा काढण्यात आली.

१९९८ मध्ये बाल मजुरीला जागतिक बंदी व्हावी ही मागणी घेऊन एक ऐतिहासिक जागतिक यात्रा काढण्यात आली. त्यात १०३ देशांतील ७२ लाख लोकांनी भाग घेतला. ही यात्रा ८० हजार किलोमीटर होती. ही चळवळ जागतिक करण्यामध्ये कैलाश सत्यार्थी यांचेच निर्विवाद नेतृत्व होते. त्यासाठी आता त्यानी ‘बचपन बचाओ आंदोलना’च्या जोडीला जागतिक पातळीवर ‘ग्लोबल मार्च अगेन्स्ट चाईल्ड लेबर’ असे संस्थाजाळे काढले जे आजही कार्यरत आहे आणि त्याच्या नेतृत्वपदी सत्यार्थी आहेत. या संस्थाजाळ्यांत जगभरातील १४० देशांतील २००० संस्था सहभागी आहेत.

माहिती स्त्रोत: सौ. विकासपीडिया

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

Mahadev Jankar: मरेन पण हाती कमळ, धनुष्यबाण घेणार नाही: महादेव जानकर

May Month Horoscope : 10 मे रोजी बुध मंगळ राशीत करणार प्रवेश, या राशीच्या लोकांना होणार धनलाभ

Baramati Lok Sabha: कमी मतदानाचा कोणाला मिळणार फायदा? खडकवासला ठरवणार बारामतीचा खासदार?

SCROLL FOR NEXT