Parenting Tips SAAM TV
लाईफस्टाईल

Parenting Tips : तुमच्या मुलांचा लाजाळू स्वभाव भविष्यासाठी घातक; पालकांनो, असा बूस्ट करा Confidence

Child Confidence : मुलांचा लाजाळू स्वभाव लहानवयातच कमी करा. यासाठी पालकांनी मुलांचा आत्मविश्वास वाढवायला हवा. या सिंपल गोष्टी लक्षात ठेवल्यास मुलं न घाबरता आपले मत मांडू शकतील.

Shreya Maskar

या जगात प्रत्येक व्यक्तीचे वेगळे व्यक्तिमत्व असते. काही लोक खूप बोलके असतात तर काही खूप अबोल. काही बिनधास्त तर काही लोक लाजाळू स्वभावाचे असतात. मात्र स्वभाव कोणताही असला तरी आपले मत मांडता येणे खूप गरजेचे असते. कारण उज्ज्वल भविष्याचा (Future) तो पाया आहे. काही मुलं लहान वयात लाजाळू असतात. मात्र पालकांनी त्यांची ही सवय वेळीच सोडली पाहिजे आणि मुलांमध्ये आत्मविश्वास (Confidence) निर्माण केला पाहिजे. कारण उत्तम भविष्य घडवायचे असल्यास आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे.

आरोग्य

मुलांचा चांगला शारीरिक आणि मानसिक विकास करणे हे पालकांचे कर्तव्य आहे. त्यामुळे पालकांनी मुलांच्या हालचालींवर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते स्वतःला नीट व्यक्त करू शकतील.

योग्य संगत

काहीवेळा मुलांच्या लाजाळू (Shy Nature) स्वभावामागे भीती देखील दडलेली असते. हे पालकांनी शोधून काढले पाहिजे. अनेक वेळा मुलं घरी बिनधास्त वावरतात मात्र शाळेत किंवा बाहेर गेल्यावर घाबरून किंवा लाजून राहतात. त्यामुळे त्यांना कोणाची भीती किंवा तुमची मुलं कोणत्या वाईट संगतीत नाही ना याची खबरदारी घ्यावी.

संवाद साधा

लहानपणापासून मुलांना बोलायची, व्यक्त होण्याची आणि आपली मते ठामपणे मांडण्याची सवय लावा कारण ही सवय भविष्यात खूप फायदेशीर ठरते. तुम्ही मुलांवर कोणत्याही गोष्टी लादू नका. त्यांच मत जाणून घ्या. त्यांना निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य द्या. मुलं चुकली तर त्यांच्यावर ओरडू नका आणि समजून घ्या.

पालकांची वर्तणूक

पालकांनी मुलांसमोर चांगली आणि योग्य वर्तणूक ठेवा. कारण मुलं तुमचे अनुकरण करत असतात. तुम्ही आत्मविश्वासाने वागा म्हणजे मुलांमध्ये देखील हा गुण येईल. तसेच भोळा स्वभाव आणि लाजाळूपणा चांगल्या भविष्यासाठी घातक ठरतो हे त्यांना पटवून द्या.

मुलांना प्रोत्साहन करा

पालकांनी मुलांना प्रत्येक वेळी नवीन गोष्ट करायला आणि शिकायला प्रोत्साहन द्या. त्यांच्या मनात कोणती भीती असेल तर ती काढून टाका. तसेच त्यांच्यावर जबाबदारी द्या म्हणजे ते जबाबदार बनतील आणि त्यांच्यात आत्मविश्वास वाढेल. मुलांची कौशल्ये विकसित करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahesh Kothare: महेश कोठारे म्हणाले मी मोदी भक्त; संजय राऊतांनी उडवली खिल्ली, म्हणाले - 'तात्या विंचू रात्री येऊन...'

Diwali Accident : ऐन दिवाळीत आक्रित घडलं, धाराशिवमध्ये दोन अलिशान कारचा भीषण अपघात, ४ जणांचा मृत्यू

Buldhana : सणासुदीच्या काळात गावात दूषित पाण्याने बाधा; पिंप्री अनेकांना गावात डायरियाची लागण

Yawning Causes: वारंवार जांभई येणं म्हणजे थकवा नव्हे; जाणून घ्या यामागची खरी कारणं

Bigg Boss 19 : गौरव खन्ना विरुद्ध संपूर्ण घर; ४ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार,पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT