Children Health Care Saam Tv
लाईफस्टाईल

Children Health: बदलत्या वातावरणात लहान मुलांची काळजी कशी घ्याल? घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Children Health Care: बदलत्या वातावरणामुळे लहान मुलांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Children Health Care Tips:

बदलत्या वातावरणाचा लोकांच्या आरोग्यावर खूप परिणाम होत आहे. नुकतीच थंडीला सुरु झाली आहे. थंडीमुळे लहान मुले खूप आजारी पडण्याचे प्रमाण वाढत आहे. हवामान बदलामुळे ताप, थंडी, खोकला, सर्दी अशा समस्या सुरु झाल्या आहेत. या काळात लहान मुलांची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे.

हिवाळा सुरु झाला म्हटल्यावर सर्दी, खोकला असे आजार होतात. लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांना या आजाराचा धोका फार जास्त असतो. या दिवसांमध्ये मुले आजारी पडू नये म्हणून त्यांच्यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांच्या आरोग्यासाठी या गोष्टींची खास काळजी घ्या.

सकस आहार

मुलांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी सकस आणि पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे. मुलांच्या आहारात प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि जीवनसत्त्वे या सर्व घटकांचा समावेश असायला हवा. रोजच्या जेवणात हिरव्या पालेभाज्या, दूध, कडधान्ये आणि अंडी या गोष्टींचा समावेश करा. याचसोबत मुलांना रोज ड्रायफ्रुट्स खायला देणे महत्त्वाचे आहे. यामुळे मुलांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली होते.

झोप

आहारासोबतच उत्तम आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. लहान मुलांच्या झोपेचे प्रमाण जास्त असते. १२ वर्षांखालील मुलांनी किमान ९ तासांची झोप घेणे गरजेचे आहे. व्यवस्थित झोप झाल्याने मुलांचा मूड चांगला असतो. त्यामुळे दिवसभर त्यांच्यात ऊर्जा असते. यामुळे मुले आजारी पडत नाही.

व्यायाम

चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. नेहमी व्यायाम करायला हवा. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी व्यायाम करणे महत्त्वाचे आहे. लहान मुलांना खेळकर असतात. खेळातून लहान मुलांचा व्यायाम होतो. शरीराची हालचाल होते. मूड चांगला राहतो. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक शरीराला फायदा होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Healthy Breakfast: नाश्त्यासाठी बनवा कमी साहित्याचा 'हा' पौष्टीक पदार्थ

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई आघाडीवर

Chopda Vidhan Sabha : निवडणुकीचे काम टाळणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर गुन्हा; विनापरवानगी राहिले गैरहजर

Assembly Election Results 2024 : राज्यात कोणाचं सरकार येणार? सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: बहुमताचा आकडा गाठला, सुरुवातीचा कल महायुतीकडे, भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत!

SCROLL FOR NEXT