Bitter Gourd Chips Saam tv
लाईफस्टाईल

Bitter Gourd Chips : कडू कारल्याला पाहाताच मुलं नाक मुरडतात ? शेफ कुणालने बनवलेले कुरकुरीत कारल्याचे चिप्स नक्की ट्राय करा, पाहा रेसिपी

Healthy Snacks : कारले जितके आरोग्यासाठी चांगले आहे तितकेचं त्याची चव कडू. त्याच्या चवीमुळे अनेकांना ते खाण्यास आवडत नाही.

कोमल दामुद्रे

Karela Crispy Chips : कारलं म्हटलं की, मुलांच्या काय मोठे देखील खाताना नाकं मुरडतात. आजकाल ही भाजी अनेकाच्या घरी पाहायला देखील मिळत नाही. कारले जितके आरोग्यासाठी चांगले आहे तितकेचं त्याची चव कडू. त्याच्या चवीमुळे अनेकांना ते खाण्यास आवडत नाही.

कडूपणा आणि चवीमुळे अनेकांना कारले (Bitter Gourd) आवडत नाही. कारल्यात जीवनसत्त्व (Vitamins) ब -१, ब-२ व ब-३ आणि जीवनसत्त्व क चा उत्कृष्ट स्त्रोत आहे. तसेच यात लोह आणि कॅल्शियम देखील असेल.आहारातील फायबरने समृद्ध, या कडू भाजीमध्ये मॅग्नेशियम, फोलेट, फॉस्फरस, जस्त आणि मॅंगनीज देखील असतात.

पण तुम्ही कधी कारल्यापासून बनवलेले क्रिस्पी चिप्स खाल्ले आहेत का? स्नॅक्ससाठी तुम्ही कारल्याच्या चिप्स (Chips) बनवू शकता. शेफ कुणाल कपूरकडून त्याची रेसिपी (Recipe) जाणून घेऊया.

1. साहित्य

  • 3-4 कारले

  • चवीनुसार मीठ

  • 1 लिंबू

  • 3-4 चमचे तेल

  • पाणी

  • अर्धा टीस्पून हळद

  • 1 टीस्पून लाल तिखट

  • 2 टीस्पून वाळलेल्या कैरी पावडर

  • 2 चमचे कॉर्न स्टार्स

  • 1 टीस्पून बेसन

2. कृती

  • कारल्याच्या बिया काढून त्यांना गोल आकारात कापून घ्या.

  • आता त्यात १ चमचा मीठ आणि लिंबाचा रस पिळून घ्या. हे कारले अर्धा तास तसेच ठेवा.

  • त्यानंतर तयार केलेल्या कारल्याच्या कापांना नीट धुवून वाळवा.

  • आता कारल्यात सर्व मसाले घालून चांगले मिक्स करावे.

  • कढईत थोडं तेल टाका आणि गरम होताच त्यात कारल्याचे तुकडे दोन्ही बाजूंनी तपकिरी होईपर्यंत तळून घ्या.

  • कुरकुरीत कारल्याच्या चिप्स तयार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farmer Protest: ऐन दिवाळीत शेतकरी रस्त्यावर, पुणे-बंगळूरू महामार्गावर रास्तारोको; उसाला 4500 रुपयांचा दर देण्याची मागणी

मुंबई महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांना 5 लाखांचा दंड, BMC आयुक्तांना सुप्रीम कोर्टानं फटकारलं

Bank Election: जिल्हा बँकांची तिजोरी कुणाकडे? साताऱ्यात शिंदेसेना भाजपचा बदला घेणार?

Vastu Tips for Shoes and Footwear: घराच्या दारासमोर चप्पल-बूट ठेवावे की नाही? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील ५ महत्त्वाचे नियम!

सत्तेतला पक्ष, पण कामांचा पत्ता नाही? वरिष्ठ नेत्यांमधील वादाचा फटका पक्षाला? देवगिरीवरील बैठकीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT