Flipkart Big Billion Days 2023 Saam tv
लाईफस्टाईल

Flipkart Big Billion Days 2023 : फ्लिपकार्टचा 'द बिग बिलियन डेज' आता क्‍लीअरट्रिपवर, बजेटमध्ये बुक करता येणार फ्लाइट तिकीट

Cleartrip Offer : क्‍लीअरट्रिप ८ ते १५ ऑक्‍टोबर २०२३ पर्यंत फ्लिपकार्टचा प्रमुख इव्‍हेण्‍ट 'द बिग बिलियन डेज' घेऊन येत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Flipkart Offer :

सणासुदीचा काळ जवळ आला असताना क्‍लीअरट्रिप कंपनी ही फ्लिपकार्टच्या वर्षातील सर्वात मोठ्या ट्रॅव्‍हल महोत्‍सवासाठी सज्‍ज झाली आहे. क्‍लीअरट्रिप ८ ते १५ ऑक्‍टोबर २०२३ पर्यंत फ्लिपकार्टचा प्रमुख इव्‍हेण्‍ट 'द बिग बिलियन डेज' घेऊन येत आहे.

या ठिकाणी ग्राहकांना कमी किमतीत आणि ऑफर्समध्ये वस्तू मिळतील. फ्लिपकार्टच्‍या टीबीबीडी एडिशनमध्‍ये आकर्षक वैशिष्‍ट्ये पाहायला मिळतील. क्‍लीअरट्रिपने युजरसाठी अनेक बदल केले आहे.

विशेषत: सणासुदीच्‍या (Festival) काळात होत असलेल्‍या वाढत्या मागणीमुळे ऑफर मिळणार आहे. तसेच यामध्ये अनेक नवीन वैशिष्ट्य मिळणार आहे. ज्याचा वापर बुकिंग (Booking) प्रक्रियेदरम्यान योग्य निर्णय घेता येईल.

ग्राहकांना वस्तू खरेदी करण्यासाठी आणि सेल्फ -सर्विसला चालना देण्यासाठी सिस्टममध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. तसेच ग्राहकांच्या समस्यांचे ऑनलाइन निराकरण झाले नाही तर त्यांना कॉलबॅकची देखील प्रोसेस आहे. तसेच सोशल मीडियावर २४/७ तास सपोर्ट मिळेल. तसेच ग्राहकांच्या समस्येवर ३० सेकंदाच्या आत प्रतिसाद देण्यात येईल.

क्‍लीअरट्रिपचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी अय्यप्‍पन म्‍हणाले, ''क्‍ली‍अरट्रिपमध्‍ये मूल्‍य, किफायतशीरपणा व पारदर्शकता ही ग्राहक अनुभवामध्‍ये वाढ करण्‍याची तत्त्वे आहेत. सणासुदीचा काळ आमच्‍या संपूर्ण ट्रॅव्‍हल इकोसिस्‍टमसाठी अत्‍यंत महत्त्वाचा कालावधी असतो. आम्‍ही कॅन्‍सल फॉर नो रिजन, सीटी फ्लेक्‍समॅक्‍स, नो-कॉस्‍ट ईएमआय, मेडि- कॅन्सल आणि बाय नाऊ पे लेटर यांसह ग्राहकांच्‍या समस्‍यांचे निराकरण करत राहू. सणासुदीच्‍या काळादरम्‍यान किमतींमध्‍ये वाढ होत असताना देखील प्रत्‍येक उत्‍पादन वापरकर्त्‍यांना फ्लाइट्स, हॉटेल्‍स व बसेससाठी सर्वोत्तम दर प्रदान करेल.''

ते पुढे म्‍हणाले, ''आम्‍हाला द बिग बिलियन डेज २०२३ सह फ्लिपकार्टचा नाविन्य जपायचे आहे. तसेच यामध्ये काहीप्रमाणात कंपनी विमान भाडे देखील ऑफर्स करते.

  • तत्‍काल: दुपारी १२ वाजेपर्यंत डेअली लिमिटेड पीरियड ऑफर

  • विमानभाडे: ९९९ रूपयांपासून देशांतर्गत विमानभाडे आणि ५९९९ रूपयांपासून आंतरराष्‍ट्रीय विमानभाडे

  • हॉटेल्‍स: देशांतर्गत हॉटेल्‍सवर ५० टक्‍के सूट

  • चाइल्‍ड फाइल्‍स फ्री: दररोज सायंकाळी ७ वाजता लिमिटेड पीरियड ऑफरदरम्‍यान बुक करण्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक २ अडल्‍ट तिकिटांसाठी १ चाइल्‍ड तिकिट मोफत (१२ वर्षांखालील मुलांसाठी)

  • सीटी फ्लेक्‍समॅक्‍स: फक्‍त ४४९ रूपयांमध्‍ये तुमच्‍या फ्लाइट्स कॅन्‍सल करा किंवा त्‍यामध्‍ये बदल करा.

  • हॉटेल भाडे: २४९९ रूपयांपासून सुरू होणारे ५-स्‍टार हॉटेल्‍स (देशांतर्गत व आंतरराष्‍ट्रीय)

  • कॅन्‍सल फॉर नो रिजन: विना अतिरिक्‍त खर्चामध्‍ये चेक-इन पर्यत हॉटेल बुकिंग्‍ज रद्द करा आणि जवळपास २५,००० रूपयांचा संपूर्ण रिफंड मिळवा.

अॅक्सिस बँक (Bank) क्रेडिट कार्ड बेनीफिट्स: यामध्ये अॅक्सिस बँक केडिट कार्ड ग्राहक विशेष सुविधांचा आनंद घेऊ शकतात, जसे मोफत सीट्स, भोजन, सुविधा शुल्‍कमध्‍ये सूट आणि सीटी फ्लेक्‍समॅक्‍स अंतर्गत फक्‍त १ रूपयांमध्‍ये फ्लाइट मोडिफिकेशन व कॅन्‍सलेशन.

वरील ऑफर्सचा लाभ घेण्‍यापूर्वी बुकिंग करण्‍यापूर्वी कृपया सर्व अटी व नियम काळजीपूर्वक वाचा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने पित्याला अमानुष मारहाण; पाहा, VIDEO

Stress Relief: फक्त ५ मिनिटांत ताण कमी करण्यासाठी प्रभावी मानसिक उपाय

Maharashtra Live News Update: शिवसेना ठाकरे गटाच्या अखिल चित्रे यांनी मंत्री नितेश राणे यांना डिवचले

BJP National President: भाजपला पहिल्यांदा मिळू शकतात महिला राष्ट्रीय अध्यक्ष, ३ नावं आहेत चर्चेत

Shirdi : साई संस्थानची बदनामी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार | VIDEO

SCROLL FOR NEXT