Chaturmas 2023 Date Saam Tv
लाईफस्टाईल

Chaturmas 2023 Date : यंदा 4 नाही तर 5 महिने असणार चातुर्मास, कधी असणार देवशयनी-देवउठनी एकादशी ? जाणून घ्या सविस्तर

कोमल दामुद्रे

Devshayani Ekadashi : हिंदू धर्मात प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. अशातच काही दिवसांनंतर आषाढ मास सुरु होणार आहे. आषाढी एकादशीही वारकरी संप्रदायांसाठी अधिक महत्त्वाची मानली जाते. त्यात सुरु होणार चातुर्मास अत्यंत महत्त्वाचा आहे.

चातुर्मासाच्या 4 महिन्यांत जास्तीत जास्त वेळ (Time) देवाची आराधना आणि भक्ती केली जाते. तसेच विविध नियमही पाळले जातात. असे म्हटले जाते की, या काळात ऋषी-मुनी चातुर्मासात प्रवास करत नाही तर एकाच जागी बसून देवाच्या भक्तीत तल्लीन होतात. भगवान विष्णू ज्या वेळेला योगनिद्रामध्ये मग्न असतात त्याला चातुर्मास म्हणतात. यालाच देवशयनी (Devshayani) व देवउठनी एकादशीचा काळ म्हटला जातो.

1. यंदा कधी आहे देवशयनी व देवउठनी एकादशी ?

आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हणतात. या दिवसापासून भगवान श्री हरी क्षीरसागरात विश्रांतीसाठी जातात. यावर्षी देवशयनी एकादशी 29 जून 2023 रोजी येत आहे. तर देवउठणी एकादशीला कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी म्हणतात.

या दिवशी भगवान विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो. यासोबतच 4 महिन्यांपासून थांबलेली शुभ कार्ये सुरू होतात. 2023 मध्ये देवउठणी एकादशी 23 नोव्हेंबर 2023 रोजी आहे. यंदा श्रावण महिन्यात अधिक मास येत असल्याने श्रावण हा २ महिन्यांचा असेल. म्हणजेच शुभ कार्य करण्यासाठी 1 महिन्यापेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागते.

2. चातुर्मास 2023 मध्ये हे काम करू नका

  • चातुर्मासात लग्न (Marriage), मुंडण, घरकाम, नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादी कोणतेही शुभ कार्य करू नये. चातुर्मासाचा काळ केवळ उपासनेसाठी योग्य आहे.

  • चातुर्मासात मांसाहार, दारू, मुळा, वांगी, लसूण-कांदा यांचे सेवन करू नये.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील बैठकीत मराठा समाजासोबत दुजाभाव, योगेश केदार यांचा आरोप

PM Modi News Update : पंतप्रधान मोदींचा वाशिम दौरा पुढे ढकलला

Shirur Breaking News : शिरूरच्या घोडेगंगा साखर कारखान्यात राडा!

Dangerous Tourist Destinations : भारतातील सर्वात खतरनाक पर्यटनस्थळे, जाण्यापूर्वी एकदा विचार करा

Mumbai Fight Video: बारच्या वॉचमनशी वाद; कर्मचाऱ्यांनी थेट पोलिसांसमोरच तरुणाला केली बेदम मारहाण, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT