Jio Bharat GPT Saam Tv
लाईफस्टाईल

ChatGPT ला टक्कर देणार Bharat GPT! जिओचे महत्त्वाचं पाऊल

Reliance Jio Infocomm : भारत जीपीटी जगभरात लोकप्रिय असलेल्या ओपन एआयने तयार केलेल्या चॅटजीपीटीशी स्पर्धा करेल. हा प्लॅटफॉर्म गेल्या वर्षी सुरू करण्यात आला होता.

कोमल दामुद्रे

Jio Bharat GPT :

ChatGPT ला टक्कर देण्यासाठी जिओचे चेअरमन आकाश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. त्यानुसार Reliance Jio Infocomm Bharat GPT वर काम करत आहे. याबाबतची माहिती पीटीआयने दिली आहे.

या प्रकल्पात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई (IIT Mumbai)याचा हातभार लागणार आहे. दोघांनी या प्रकल्पासाठी पार्टनरशीप केली आहे. आयआयटी-बॉम्बे इन्स्टिट्यूटच्या वार्षिक टेकफेस्टमध्ये आकाश अंबानी यांनी ही माहिती दिल्याचे वृत्तात म्हटले आहे. भारत जीपीटी जगभरात लोकप्रिय असलेल्या ओपन एआयने तयार केलेल्या चॅटजीपीटीशी स्पर्धा करेल. हा प्लॅटफॉर्म गेल्या वर्षी सुरू करण्यात आला होता.

1. जिओ 2.0

आकाश अंबानी यांनी जिओ (Jio) 2.0 आणि त्यांच्या नवीन प्रकल्पाविषयीची माहिती दिली आहे. त्यासाठी कंपनीने (Company) दमदार ईको सिस्टिम विकसीत करण्यावर भर दिला. यासाठी रिलायन्स जिओने आयआयटी बॉम्बेसोबत करारही केला आहे. यासाठी generative AI तयार करणे आणि अनेक भाषा विकसित करण्याची तयारी केली आहे. हे तंत्रज्ञान ChatGPT सारखे असणार आहे.

2. TV OS वर काम सुरु

BharatGPT च्या या नवा प्रकल्पाशिवाय आकाश अंबानी आणि जिओ टीम अजून एका प्रकल्पावर काम करत आहे. हे एक टेलिव्हिजन तंत्रज्ञान असून कंपनी स्वत:च्या टीव्हीसाठी एक ऑपरेटिंग सिस्टिम तयार करत आहे. त्यामुळे जिओ पुन्हा मार्केटमध्ये आपले वर्चस्व तयार करेल.

3. ChatGPT चे काम काय?

ChatGPT हे AI चे टूल आहे. याला कृत्रिम बुद्धिमत्ता चाचणीचे चॅटबॉट आहे. हे टूल आपल्या अनेक प्रश्नांचे उत्तर देते. याच्या मदतीने आपण मेसेज, पोस्ट, ई-मेल यांसारख्या अनेक गोष्टी करता येऊ शकते. ChatGPT ला OPEN AI या कंपनीने तयार केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Miss Universe 2024: अवघ्या २१ वर्षीय डेनमार्कच्या व्हिक्टोरिया केजरने पटकावला मिस युनिव्हर्स २०२४ चा किताब; सोशल मीडियावर चर्चा

Virat Kohli Record: पर्थ कसोटीत विराट रचणार इतिहास! अवघ्या २१ धावा करताच दिग्गजांना मागे सोडणार

Viral Video: शेवटी आई ती आईच! समुद्रात वाहून जाणाऱ्या लेकीला वाचवले, थरार घटना कॅमेऱ्यात कैद

Aai Tuljabhavani: आई तुळजाभवानी मालिकेत उलगडणार नवा अध्याय, देवीने स्पर्श केलेला चिंतामणी पाषाणाचा अद्भुत महिमा

Maharashtra News Live Updates: नाशिकमधील वंचितचे उमेदवार अविनाश शिंदे यांच्या गाडीला अपघात

SCROLL FOR NEXT