Chashma Cleaning Tips Saam Tv
लाईफस्टाईल

चष्मा रोज व्यवस्थित ठेवला, स्वच्छ केला तरी त्यावर स्क्रॅच कसे पडतात?

Chashma Cleaning Tips: चष्मा रोज स्वच्छ करूनही त्यावर स्क्रॅच का पडतात? शर्ट किंवा कोरड्या कापडाने पुसण्याचे धोके आणि लेन्स क्लिनर व मायक्रोफायबर कापडाने चष्मा स्वच्छ करण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.

Manasvi Choudhary

चष्मा रोज व्यवस्थित ठेवला, स्वच्छ केला तरी त्यावर स्क्रॅच कसे पडतात असा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु तुम्हाला माहितीये का? काही सामान्य चुका केल्यामुळे चष्म्यावर स्क्रॅचेस पडतात. चष्म्यावर घाण किंवा धूळ जमा झाली असेल तर अनेकजण शर्टच्या कोपऱ्याने किंवा कोणत्याही कोरड्या कापडाने घासून तो स्वच्छ करतात. परंतु तुम्हाला माहितीये का? चष्मा स्वच्छ करण्याची ही पद्धत अत्यंत चुकीची आहे. जर तुम्ही सुद्धा असे करत असाल तर थांबा,

चष्म्यावर साचलेली धूळ आणि घाण स्वच्छ करण्यासाठी तुम्ही चष्म्यावर कपडाने घासता तेव्हा लेन्सच्या पृष्ठभागावर स्क्रॅचेस पडतात. सुरूवातील हे स्क्रॅचेस फारसे दिसत नसले तर नेहमीनेहमी असे केल्याने चष्मा खराब होतो.

चष्मा घासण्याचा धोका

जेव्हा तुम्ही घराबाहेर असता तेव्हा हवेतील धुळीचे सूक्ष्म कण चष्म्याच्या लेन्सवर जमा होतात त्यामुळे चष्मा अस्वच्छ होतो. परंतु चष्मा स्वच्छ करताना आपण कोणताही स्प्रे न वापरता थेट लेन्स घासतो त्यामुळे लेन्सवरील कोटिंग कमी होते आणि चष्म्यावर स्क्रॅचेस पडतात.

स्क्रॅचेस का पडतात?

चष्मा वापरताना योग्य पद्धतीने स्वच्छ न केल्यास त्यावर स्क्रॅचेस पडतात. आपल्यापैकी बरेचजण चष्मा पुसण्यासाठी कापडाने घासतात त्यामुळे चष्म्याच्या पृष्ठभागावरील धुळीचे कण लेन्समध्ये साचून राहतात ज्यामुळे डाग देखील पडतात.

चष्मा स्वच्छ करण्याची योग्य पद्धत

चष्मा स्वच्छ करण्यासाठी नेहमी लेन्स क्लिनर स्प्रे वापरा. जर स्प्रे नसेल तर तुम्ही लेन्स पाण्याने स्वच्छ धुवा म्हणजे त्यावरील धुळीचे कण निघून जातील. त्यानंतर मायक्रोफायबर कापडाने पुसून घ्या. लेन्स कधीही शर्ट, टॉवेल किंवा टिश्यू पेपरने पुसू नका कारण यामुळे लेन्स खराब होऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Winter Vegetables : कडाक्याच्या थंडीतही शरीर राहील उबदार, आवर्जून खा 'या' ५ भाज्या

EPFO Pension Hike : पेन्शनधारकांना मोठं गिफ्ट मिळणार? 1,000 रुपयांची पेन्शन थेट 3,000 रुपये होण्याची शक्यता

Maharashtra : महाराष्ट्रातील मेट्रो स्थानकांची नावे बदलणार? राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Health Tips : चिंता आणि तणाव दूर करायचाय? औषधांशिवाय मन शांत ठेवण्यासाठी करा हे 7 सोपे उपाय

Maharashtra News Live Update: बाळासाहेब ठाकरेंचा फोटो फाडल्याने धुळ्यात संताप

SCROLL FOR NEXT