बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण पिढीत वाढतोय ह्रदयविकाराचा धोका
बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण पिढीत वाढतोय ह्रदयविकाराचा धोका Saam Tv
लाईफस्टाईल

बदलत्या जीवनशैलीमुळे तरुण पिढीत वाढतोय ह्रदयविकाराचा धोका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आजच्या धावपळीच्या जीवनात, लोक सहसा त्यांच्या जीवनशैलीकडे हवे तेवढे लक्ष देत नाहीत किंबहुना वेळ देता येत नाही. पण, यामुळे अनेक मोठ्या आजारांना सामोरे जावे लागते. जसे की, हृदयविकाराचा झटका, मधुमेह यासारखे गंभीर आजार उद्भवू शकतात. याचे मुख्य कारण म्हणजे योग्य आहार न घेणे, व्यायामाचा अभाव, झोपेचा अभाव. वृद्धांपासून तरुणांपर्यंत हृदयविकाराचा धोका वाढला आहे. आजकाल तरुण पिढीही हृदयविकाराच्या विळख्यात अडकत आहे.

बिग बॉस 13 चा विजेता आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे इंडस्ट्रीला धक्का बसला आहे. सिद्धार्थ त्याच्या फिटनेससाठी प्रसिद्ध होता आणि तो निरोगी जीवनशैली जगत होता. असे असूनही, वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले आहे. भारतात गेल्या काही वर्षांमध्ये तरुणांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

हे देखील पहा-

असामान्य हृदयाचे ठोके- एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचा ठोका वाढणे किंवा कमी होणे सामान्य आहे. परंतु जर तुमच्या हृदयाची धडधड काही सेकंदांपेक्षा जास्त काळ नियंत्रणाबाहेर जात असेल तर ती मोठी समस्या निर्माण करू शकते. या परिस्थितीत त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.

जबडा, दात किंवा डोके दुखणे- डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, अनेक रुग्णांनी हार्ट अटॅक येण्यापूर्वी हात, जबडा, दात किंवा डोके दुखण्याची तक्रार केली आहे. जर तुम्हाला देखील या प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर ते शक्य तितक्या लवकर डॉक्टरांकडून तपासून घ्या.

सतत खोकला- सतत खोकला हार्ट अटॅक किंवा हृदयाशी संबंधित रोगांशी जोडणे योग्य नाही. परंतु जर तुम्हाला कोणत्याही हृदयरोगाचा त्रास होत असेल तर सतत खोकल्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

छातीत जळजळ- जर तुमच्या छातीत सतत जळजळ होत असेल किंवा तुम्ही अपचनाच्या समस्येने ग्रस्त असाल तर तुम्ही सावध असले पाहिजे.

घोरणे- झोपेत घोरणे ही एक सामान्य गोष्ट आहे. तथापि, मोठ्याने घोरण्याच्या आवाजामुळे गुदमरल्याची भावना स्लीपिंग एपनियाचे लक्षण आहे. रात्री झोपताना अनेक वेळा आपला श्वास थांबतो, ज्यामुळे हृदयावर अतिरिक्त भार पडत असतो.

घाम येणे - शरीरातून जास्त घाम येणे हे देखील हृदयविकाराचे लक्षण असू शकते. विशेषत: जर तुम्हाला कमी तापमानात म्हणजेच थंडीतही घाम येत असेल तर ही समस्या अधिक गंभीर बनू शकते.

उलट्या होणे - वारंवार उलट्या होणे आणि ओटीपोटात दुखणे देखील हृदयविकाराच्या झटक्यापूर्वी दिसणाऱ्या लक्षणांपैकी हे एक असू शकते.

हातावर किंवा टाचांवर सूज येणे - जर एखाद्या व्यक्तीचे पाय, बोटे किंवा टाचांवर सूज येण्याची समस्या वाढत असेल तर ती गंभीर बाब असू शकते. डॉक्टर म्हणतात की अनेकदा जेव्हा एखाद्या व्यक्तीचे हृदय रक्त व्यवस्थित पंप करू शकत नाही, तेव्हा हात आणि पायांवर सूज वाढू लागते.

श्वास घेण्यात अडचण - जर श्वास घेण्यात अडचण येत असेल किंवा पूर्ण श्वास घेतल्यानंतरही तुम्हाला श्वासोच्छवास कमी वाटत असेल तर ते हृदयविकाराचे लक्षण असू शकते. या व्यतिरिक्त, काही लोकांना चिंता, पचन, छातीत जळजळ आणि ओटीपोटात दुखण्याची समस्या देखील असू शकते.
Edited By-Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

kitchen Tip: सुक खोबर वर्षभर साठवण्याची जाणून घ्या 'ही' असरदार पद्धत

कपिल शर्माच्या The Great Indian Kapil Show ने दीड महिन्यातच बोजा बिस्तारा गुंडाळला, समोर आलं मोठं कारण

Sharad Pawar Speech: असत्य बोलणं मोदी साहेबांचे वैशिष्ट्य... माढ्यातून शरद पवारांचा प्रहार; केंद्र सरकारवर टीकास्त्र

Today's Marathi News Live : पुण्यात भाजप युवा मोर्चाकडून काँग्रेस विरोधात आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड

Reasons for Obesity : 'या' कारणंमुळे तुमचे वजन झपाट्याने वाढतंय

SCROLL FOR NEXT