Chanakya Niti On life Saam tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On life : या 8 लोकांपासून चार हात लांबच राहा, नाहीतर आयुष्यात येईल मोठ वादळ...

Chanakya Niti On Human Nature : चाणक्य सांगतात, माणसांचा स्वभाव बदलेल पण त्याची वृत्ती ती कधीच बदलणार नाही.

कोमल दामुद्रे

Chanakya Niti On Life Lesson : आपल्या आजूबाजूला अशी बरीचशी माणसं असतात ज्यांच्या स्वभावामुळे आपल्या आयुष्यात अनेक संकटे येतात. ज्याचा आपल्याला सामना करावा लागतो. चाणक्य नीतीमध्ये अशी माणसं सापापेक्षा पण अधिक विषारी सांगितली आहे.

चाणक्य सांगतात, माणसांचा स्वभाव (Nature) बदलेल पण त्याची वृत्ती ती कधीच बदलणार नाही. त्यामुळे आपण आयुष्यात या ८ माणसांपासून नेहमीच सावध राहायला हवं. आचार्य चाणक्य (Chanakya) यांनी लिहिलेल्या अनेक गोष्टींवर लोक अजूनही विश्वास ठेवतात.त्यांनी नीतिशास्त्रात मित्रांपासून (Friends) शत्रुत्वापर्यंतच्या धोरणाचा उल्लेख केला आहे.

अशी परिस्थिती लक्षात घेऊन आचार्य चाणक्य यांनी आपले मत मांडले आहे. एका श्लोकाद्वारे त्यांनी 8 प्रकारच्या लोकांबद्दल सांगितले, ज्यांच्यावर चुकूनही विश्वास ठेवू नये. जाणून घेऊया त्याबद्दल

1. राजा वेश्या यमो ह्यग्निस्तकरो बालयाचको ।

पर दुःखं न जानन्ति अष्टमो ग्रामकंटका: ।।

या श्लोकात चाणक्य सांगतात की जगात 8 प्रकारचे लोक आहेत ज्यांना कोणत्याही व्यक्तीचे दु:ख कधीच समजत नाही. चाणक्यानुसार राजा, यमराज, अग्नि, बालक, चोर, वेश्या, भिकारी यांच्यावर कोणाच्याही दुःखाचा प्रभाव पडत नाही. यासोबतच गावकऱ्यांना वेदना देणाऱ्यांना इतरांचे दुःख बघून दुःखी देखील होता येत नाही.

तसेच चाणक्य म्हणतात की, आपली व्यथा किंवा वेदना त्याच्या समोर मांडू नका, त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा परिणाम होणार नाही. या लोकांचा आयुष्यात सामना करायचा असेल तर संयम व समजूतदारपणांने वागायला हवे. त्यासाठी या लोकांपासून केव्हाही दूर राहाणे चांगले.

2. तक्षकस्य विषं दन्ते मक्षिकायास्तु मस्तके।

वृश्चिकस्य विषं पुच्छे सर्वाङ्गे दुर्जने विषम् ।।

चाणक्य म्हणतात की सापाचे विष दातांत, माशीचे विष डोक्यात आणि विंचूचे विष शेपटीत असते. म्हणजेच विषारी प्राण्यांच्या प्रत्येक अंगात विष असते. पण दुष्ट माणसाचे सर्व अवयव विषाने भरलेले असतात. हे लोक नेहमी स्वतःच्या रक्षणासाठी स्वतःचे विष वापरतात. यामुळे त्याच्यापासून लांब राहायला हवे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT