Chanakya Niti On Money Saam tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Money : अचानक धन मिळाल्यावर करु नका या चुका, व्हाल कंगाल ! चाणक्यांच्या या गोष्टी लक्षात ठेवा

Chanakya Niti Advice: : आपल्याला अचानक धनप्राप्ती झाली तर ?

कोमल दामुद्रे

Saving Money : हल्लीच्या महागाईच्या जगात पैसा प्रत्येकालाच हवा असतो. वाढत्या गरजांमुळे माणूस पैसा मिळवण्यासाठी अनेक चांगले वाईट कर्म करतो. अशातच आपल्याला अचानक धनप्राप्ती झाली तर ?

अचानक खूप पैसा (Money) मिळाला तर त्या व्यक्तीच्या आनंदाला थारा नाही. या आनंदापोटी तो अनेकवेळा अशी कामे करतो, ज्यामुळे त्याचे पैसे कमी होऊ लागतात. चाणक्य नीतीमध्ये अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्याची काळजी (Care) घेतल्यास माणूस गरीब होण्यापासून वाचू शकतो.

1. चुकूनही हे काम करू नका

अनेक वेळा पैसा आला की लोकांना गर्व येतो. त्यामुळे इतरांशी आपले नातेसंबंध (Relationship) बिघडतात. दिखावा करण्याऐवजी तो पैसा इतरांना आणि स्वत:च्या मदतीसाठी वापरला पाहिजे. ज्यामुळे कठीण काळात आपली मदत करण्यासाठी लोक पुढे सरसावतात.

2. दुसऱ्याची मदत नको.

आपल्या चाणक्य धोरणात आचार्य चाणक्य म्हणतात की जेव्हा तुम्हाला पैसा मिळेल तेव्हा तुम्ही अति संयमाने खर्च करायला हवा. संकटकाळात पैसा हा सर्वात मोठा मित्र असतो. अशावेळी पैसे वाचवून ठेवत नसून तर आपल्याला इतर वाईट प्रसंगाना सामोरे जावे लागते.

3. पैशाची प्रशंसा करू नका

चाणक्य म्हणतात की, जेव्हा तुमच्याकडे पैसा येतो तेव्हा तुम्ही बाहेरच्या लोकांसमोर त्याची बढाई मारू नका. असे केल्याने चोर आणि शत्रू सक्रिय होतात आणि ते तुमचे नुकसान करू शकतात.

4. ही चूक नको

अचानक आलेल्या पैशाचा वापर इतरांना अपमानित करण्यासाठी किंवा कोणाचे नुकसान करण्यासाठी करू नये. असे केल्याने देवी लक्ष्मीचा कोप होऊ शकतो आणि तुम्हाला गरिबीचा सामना करावा लागू शकतो. पैशाचा वापर चांगल्या गोष्टींसाठीच केला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT