Chanakya Niti On Relationship Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Relationship : या स्वभावाच्या मुलांवर मुली ओवाळून टाकतात जीव; पहिल्याच नजरेत होतात आकर्षित

कोमल दामुद्रे

Relationship Advice : सध्याच्या काळात मुली आपला परफेक्ट जोडीदार निवडतात. खरेतर कामाच्या ठिकाणी, सध्याच्या काळात एखाद्या व्यक्तीवर आपले प्रेम असणे ही भावना साहाजिक आहे. प्रेमात पडल्यानंतर सुरुवातीच्या काळात आपल्या जोडीदाराला आपला स्वभाव व इतर अनेक गोष्टी आवडू लागतात. त्याच वेळी, काही वेळानंतर, दोघेही एकमेकांमध्ये दोष शोधू लागतात.

आचार्य चाणक्यांनी मुला-मुलींच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ज्या मुलामध्ये हे गुण आढळतात त्या मुलावर मुली खूप प्रेम करतात असे त्यांनी म्हटले आहे. जिथे विश्वास असतो तिथे कोणतेही बंधन नसते. जे पुरुष आपल्या जोडीदारावर स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवतात, त्यांचे नाते दीर्घकाळ टिकते. जे पुरुष आपल्या लाइफ पार्टनरला त्यांच्या इच्छेनुसार आयुष्य जगू देतात आणि कोणतेही बंधन घालत नाहीत, त्यांचे नातेही दीर्घकाळ टिकते. जाणून घेऊया मुलींना मुलांमधले कोणते गुण अधिक आवडतात.

1. आदर

नात्यांमध्ये (Relationship) आदर असणे खूप गरजेचे आहे. जिथे आदर नाही तिथे नाती जास्त काळ टिकू शकत नाहीत. चांगल्या नात्याचा पाया आदर आणि प्रेमावर आधारित असतो. जे पुरुष स्त्रियांचा (Women) आदर करतात, त्यांच्याशी स्त्रियांचे प्रेमसंबंध दीर्घकाळ टिकतात.

2. सुरक्षा

चाणक्य नीतीनुसार, महिलांना अशा पुरुषांसोबत राहणे आवडते ज्यांच्यासोबत त्यांना सुरक्षित वाटते. जे पुरुष महिलांचे संरक्षण करू शकत नाहीत, त्यांचे प्रेमसंबंध फार काळ टिकत नाहीत.

3. अहंकारी

चाणक्य नीतिनुसार जे पुरुष अहंकारी नसतात, त्यांचे प्रेमसंबंध (Love) जोडीदारासोबत दीर्घकाळ टिकतात. नात्यात गोडवा ठेवायचा असेल तर त्याच्यात अहंकार नसावा. गर्विष्ठ पुरुष स्त्रियांना आवडत नाहीत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटाची सोमवारी ८० उमेदवारांची यादी जाहीर होणार

Mumbai Local train : मध्य रेल्वेवर मोठा अपघात! लोकलचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांचे हाल

Eknath Shinde : CM शिंदे थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टरची करावी लागली इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: ठाकरे-काँग्रेसचं फाटलं? पत्रकार परिषदेत मविआतला विसंवाद चव्हाट्यावर; VIDEO

Sillod Politics : सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची एकाहाती सत्ता कोण भेदणार? महाविकास आघाडीकडून कोणाची तयारी? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT