Chanakya Niti Quotes  Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti Quotes : वाईट काळातून बाहेर पडायचंय? आयुष्यात नक्कीच अवलंबा चाणक्यांचे हे सल्ले

Motivation Quotes : आचार्य चाणक्य हे विद्वान असण्यासोबतच एक महान शिक्षक देखील होते, त्यांनी दिलेल्या धोरणांचा अवलंब करून जीवनात यश मिळवता येते. आचार्य चाणक्य यांनी जगप्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठात शिक्षण घेतले होते.

Shraddha Thik

Chanakya Niti :

आचार्य चाणक्य हे विद्वान असण्यासोबतच एक महान शिक्षक देखील होते, त्यांनी दिलेल्या धोरणांचा अवलंब करून जीवनात यश मिळवता येते. आचार्य चाणक्य यांनी जगप्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठात शिक्षण घेतले होते. चाणक्य नीती पैसा, आरोग्य, व्यवसाय, वैवाहिक जीवन, समाज आणि जीवनातील यशाशी संबंधित गोष्टींची माहिती देते. या गोष्टींचा अंगीकार कोणत्याही व्यक्तीने आपल्या जीवनात केल्यास तो यशाची (Success) नवीन शिखरे गाठू शकतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी वाईट काळाबद्दल सांगताना म्हटले आहे की, कठीण काळात कोणत्याही व्यक्तीचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे कठोर परिश्रम. काही काळ मेहनत करून त्यावर मात करता येईल.

श्लोक

यद् दूरं यद् दुराराध्यं यच्च दूरे व्यवस्थितम्।

तत्सर्वं तपसा साध्यं तपो हि दुरतिक्रमम्।।

या श्लोकाच्या माध्यमातून आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, कठीण काळात कोणत्याही व्यक्तीचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे त्याची मेहनत असते, ज्याद्वारे तो आपला काळ बदलू शकतो. त्यामुळे अडचणीच्या काळात माणसाने हिंमत न हारता कठोर परिश्रम केले पाहिजे.

कठोर परिश्रमाचे महत्त्व सांगताना आचार्य चाणक्य म्हणाले की, कोणतीही गोष्ट आपल्या आवाक्याबाहेर असली तरी तिथपर्यंत पोहोचणे आपल्याला अशक्य वाटू शकते, परंतु त्यासाठी कधीही हिंमत गमावू नये. कठोर परिश्रमाने कोणतेही काम पूर्ण करता येते आणि कोणतेही अशक्य वाटणारे ध्येय गाठता येते.

आळस टाळा

आचार्य चाणक्य यांच्यानुसार, व्यक्तीने कठीण काळात आळशी होणे टाळले पाहिजे. जर तुम्ही आळस सोडला आणि कोणतेही काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही सर्वात कठीण उद्दिष्टे देखील साध्य कराल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT