Chanakya Niti On Problem Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Problem : आयुष्यात शांत चित्ताने विचार केल्याने मार्ग होतील मोकळे, छोट्यापासून मोठ्या समस्यांवर करता येईल मात; जाणून घ्या

Shraddha Thik

Chanakya Niti :

आचार्य चाणक्यांची धोरणे खुप कठीण आहेत, पण हे कठोरपण जीवनाचे सत्य दर्शवतात. आपल्या व्यस्त जीवनात आपण या कठोर धोरणांकडे दुर्लक्ष करतो, परंतु हे शब्द आपल्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी मदत करतात. आज आपण आचार्य चाणक्यांच्या धोरणांपैकी एका विचाराचे विश्लेषण करूयात.

'रागाच्या भरात समस्या सुटू शकत नाहीत, पण शांत मन असल्यावर प्रत्येक समस्येवर उपाय शोधू शकते.' आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य (Chanakya) यांच्या या विधानाचा अर्थ असा आहे की व्यक्ती शांत मनाने कोणतीही समस्या सोडवू शकते. मग ती समस्या कितीही मोठी असली तरी ती समस्या सोडवता येते. पण रागाच्या भरात तो छोट्या छोट्या समस्याही सोडवू शकत नाही. कारण रागाच्या भरात त्याचा मेंदू आधी काम करणे थांबवतो.

वास्तविक जीवनात असे अनेक प्रसंग येतात जिथे एखादी व्यक्ती कोणत्या ना कोणत्या समस्येत (Problem) अडकते. अशावेळी या समस्येतून बाहेर पडणे अशक्य असल्याचे दिसते. पण जर एखाद्या व्यक्तीने शांत राहून त्या समस्येच्या उपायांचा विचार केला तर तो त्यावर मात करू शकतो. म्हणजे शांत मनाने त्याला भेडसावत असलेली प्रत्येक समस्या सोडवू शकतो.

याउलट, जर तुम्ही रागवत असाल आणि एखाद्या समस्येवर उपाय शोधत असाल तर सर्व प्रयत्न करूनही तुमचे हात रिकामेच राहतील. याचे कारण असे की रागाच्या भरात एखादी व्यक्ती सर्वप्रथम आपल्या मनाचा वापर करणे थांबवते.

त्यावेळी इतका राग (Anger) येतो की काही वेळा त्याला स्पष्ट गोष्टीही अस्पष्ट होतात. म्हणजे त्याच्यासमोर उपाय असला तरी तो दुर्लक्ष करतो. यासाठी आचार्य चाणक्य यांनी म्हटले आहे की, रागाच्या भरात समस्या सुटू शकत नाहीत, परंतु शांत मनाने प्रत्येक समस्येवर उपाय शोधला जाऊ शकतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Budh Uday: ऑक्टोबर महिन्यात बुध ग्रहाचा होणार उदय; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन

Rain Alert : मराठवाडा-विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; मुंबई-पुण्यात कसं असेल वातावरण? वाचा वेदर रिपोर्ट

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT