Chanakya Niti On Relatives : तुमच्याकडे या गोष्टींची कमतरता असल्यास, नातेवाईकांकडे जाणे टाळा; जाणून घ्या या मागचे कारण

Relatives : आचार्य चाणक्य यांची धोरणे आणि विचार थोडे कठोरच असतात.
Chanakya Niti On Relatives
Chanakya Niti On Relatives Saam Tv

Chanakya Niti :

आचार्य चाणक्य यांची धोरणे आणि विचार थोडे कठोरच असतात. परंतु हा कठोरपणा जीवनाचे सत्य सांगतात. आपल्या व्यग्र जीवनात आपण या सर्व विचारांकडे दुर्लक्ष करतो, परंतु हे विचार आपल्या जीवनाच्या प्रत्येक अडचणींमध्ये कामी येतात. आज आपण आचार्य चाणक्यांच्या या विचारांपैकी एका वाक्याचे विश्लेषण करूयात.

'एखाद्याने गरीब असताना नातेवाईकांसोबत कधीही राहू नये.' आचार्य चाणक्य

Chanakya Niti On Relatives
Chanakya Niti On Human Behaviour : एखाद्या व्यक्तीला ओळखण्यासाठी तिची परीक्षा घेताना ही पध्दत अवलंबा, अन्यथा होईल फसवणूक

आचार्य चाणक्य यांच्या या विधानाचा अर्थ असा आहे की, जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्याजवळ पैसे (Money) कमी असल्याचे समजते तेव्हा त्याने आपल्या नातेवाईकांकडे अजिबात जाऊ नये. याचे कारण असे की जर नातेवाईकांना हे कळले तर ते तुमच्याकडे हीन नजरेने बघतील.

तुमच्याशी नीट बोलणार नाही. ते कदाचित तुम्हाला अशा दुखावलेल्या गोष्टीही बोलतील की त्या ऐकून तुम्हाला खूप वाईट वाटेल.

अनेक वेळा लोकांना वाटतं की ते नातेवाईक (Relatives) असतील तर जायला हरकत नाही. जर तुम्हीही असा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की संकटाच्या वेळी फक्त तुमचे कुटुंबच एकमेकांना साथ देऊ शकते. तुम्ही तुमच्या कुटुंबावर विसंबून राहू शकता परंतू इतर नातेवाईक फक्त आनंदाच्या वेळी येतात.

तुम्ही निराधार आहात हे त्यांना कळले तर तुमचे फार थोडे नातेवाईक तुमच्या पाठीशी उभे राहतील. ज्या रस्त्यावर तुमचे घर (Home) आहे त्या रस्त्यावरून बरेच लोक येणे-जाणे बंद करतील. याच कारणांमुळे आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की, गरीब असताना कधीही आपल्या नातेवाईकांसोबत राहू नये.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com