Chanakya Niti On Relationship Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Relationship : 'दोघांत तिसरा आता सगळं विसरा'; या 3 गोष्टींवरुन कळेल, नवऱ्याच्या दुसऱ्या अफेरबद्दल...

Husband Cheating On Wife : प्रेम करणाऱ्या व्यक्तीमध्ये कधी दुरावा येईल हे कुणीच सांगू शकत नाही.

कोमल दामुद्रे

Relationship Tips : प्रेम करणाऱ्या व्यक्तीमध्ये कधी दुरावा येईल हे कुणीच सांगू शकत नाही. रुसवे-फुगवे हे प्रत्येक नात्यात येत असतात. पण ते नात्यात किती काळ ठेवायला हवे हे प्रत्येक जोडप्याला चांगलेचं ठाऊक असते.

चाणक्य म्हणतात की, कधी कधी आपल्या वागण्या-बोलण्यामुळे नात्यात दूरावा येतो. त्यामुळे पुरुष हा दुसऱ्या स्त्रीजवळ आकर्षित होतो. त्याला समजून घेणारी किंवा त्याची काळजी घेणारी तुमच्याशिवाय दुसरी कोणती व्यक्ती त्याच्या आयुष्यात आली तर नात्याला ग्रहण लागते. यामुळे तुमच्या नात्यात दूरावा येतो. आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात दुसऱ्या स्त्रीने प्रवेश केला आहे ते ओळखायचे कसे याबाबत अनेक स्त्रियांना माहित नसते. ते कसे ओळखाल जाणून घेऊया

1. फोनला हात लावू न देणे

पत्नीने अचानक मोबाईल (Smartphone) आणि कम्प्युटरला हात लावल्यास ओरडणे किंवा त्यापासून दूर राहा असे सतत सांगणे. चूका नसतानाही ओरडत राहाणे. सतत फोनमध्ये घुसून राहाणे. पत्नीशी (Wife) बोलण्याऐवजी मोबाईलवर चॅट करण्यात जास्त वेळ घालवत राहाणे.

2. नात्यात दूरावा

शारीरिक जवळीक हा वैवाहिक जीवनाचा एक भाग आहे. कालांतराने नात्यात या गोष्टी कमी होतात. जर तुमचा होणारा स्पर्श नवऱ्याला आवडत नसले किंवा नात्यात भावनिक गोष्टीच नसतील. तुमच्या नात्यातील (Relationship) आकर्षण संपले असेल तर वेळीच सावध व्हा.

3. ऑफिसमध्ये अधिक वेळ

बरेचदा कामामुळे नवरा हा ऑफिसमध्ये अधिक काळ राहातो. परंतु, जर तो दररोज घरी उशीरा येत असेल तर पत्नींने या गोष्टीची दखल घ्यायला हवी. जर तुमचा नवरा खरचं कामात व्यस्त असेल तर त्याचे ऑफिस कॉल्स व इतर गोष्टी घरी देखील सुरु असतात पण यांच्या विरुद्ध होत असेल तर महिलांना या गोष्टींची दखल घ्यायला हवी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐन दिवाळीत राजकीय धमाका! निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का; दोन बडे नेते पक्षाला ठोकणार रामराम!

Maharashtra News Live Update: रामदास कदम यांच्या वक्तव्याचा रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर निषेध; रायगडमध्ये आंदोलनाचा इशारा

APMC Market Rates : राजापुरी सेलम हळदीला सोन्याचा भाव! दिवाळी पाडव्याला मिळाला तब्बल ६५ हजारांचा विक्रमी दर

Pune Crime: लोणी काळभोरमध्ये माजी सरपंचाची गुंडगिरी! हॉटेलमध्ये घुसून मालकासह कामगारांना बेदम मारहाण

Custard Apple : लांबसडक अन् घनदाट केसांसाठी सीताफळ फायदेशीर, 'असा' करा वापर

SCROLL FOR NEXT