Chanakya Niti On Behaviour  Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Behaviour : दुसऱ्यांच्या सुखासाठी कधीच या 4 गोष्टींचा त्याग करु नका, चाणक्यांनी दिला सल्ला

Life Lesson : बरेचदा आपल्याला जीवनात अनेक वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो.

कोमल दामुद्रे

Chanakya Niti On Sacrifice : आपले आयुष्य सुखी होण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो. आयुष्य आनंदी किंवा यशस्वी बनवण्यासाठी काही गोष्टींचे पालन करायला हवे. बरेचदा आपल्याला जीवनात अनेक वाईट परिस्थितीचा सामना करावा लागतो.

आचार्य चाणक्यांच्या मते, खरा यशस्वी व्यक्ती तोच असतो जो इतरांना यशस्वी होण्यासाठी प्रेरित करतो. धनाची देवी लक्ष्मीही अशा लोकांच्या पाठीशी उभी असते. चाणक्य सांगतात की जीवनात यशस्वी होण्यासाठी काही गोष्टी अशा आहेत ज्या माणसाने कधीही सोडू नयेत.

1. मैत्री

चाणक्य (Chanakya) म्हणतात की, नेहमी त्यांच्याशीच मैत्री करा जे तुमच्या क्षमतेशी जुळतात. लोकप्रिय लोकांशी मैत्री (Friendship) फार काळ टिकत नाही. ज्यांचा स्वभाव तुमच्या विरुद्ध आहे अशा लोकांशी मैत्री करू नका. आपली मैत्री ही फक्त समविचारी लोकांशी असायला हवी. इतर गोष्टींसाठी आपल्या चांगल्या मैत्रीचा त्याग करू नका असा सल्ला देतो.

2. ज्ञान

ज्ञान हे माणसाला अमृत प्रदान करते. म्हणून जेव्हा कुठेही ज्ञान मिळत असते तेव्हा ते आत्मसात करता यायला हवे. ज्ञान कधीही व्यर्थ जात नाही. ज्ञान आणि राजकारण नेहमीच सारखे नसू शकते. ज्ञान ही अशी शक्ती आहे जी संकटाच्या वेळी (Time) माणसाची सर्वात मोठी ताकद बनते.

3. अभिमान

आपला अभिमान सोडून पैशाकडे वळणे हे अत्यंत मूर्खपणाचे आहे. गर्व कधीही स्वार्थ समजू नये. चाणक्य म्हणतो की, जे असे करतात त्यांचा समाजात आदर कमी होतो. म्हणूनच चाणक्य म्हणतात की कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमचा अभिमान सोडू नका.

4. अनुभव

जो व्यक्ती इतरांच्या चुकांमधून शिकतो तो आयुष्यात कधीही अपयशी होत नाही. जर तुम्हाला सर्व काही स्वतः अनुभवायचे असेल आणि शिकायचे असेल तर तुमचे आयुष्य पुरेसे नाही. यश मिळवायचे असेल तर इतरांच्या अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करा. एखाद्याच्या अनुभवाकडे दुर्लक्ष करू नका.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

Anil Deshmukh : मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कारवर दगडफेक; हल्ल्यात गंभीर जखमी

Maharashtra Election : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पैशांचा पाऊस; राज्यात आतापर्यंत किती कोटी रोकड जप्त? वाचा

SCROLL FOR NEXT