Chanakya Niti On Teacher Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Teacher : करिअरच्या दृष्टिने शिक्षक निवडताना चाणक्यांची ही एक गोष्ट लक्षात घ्या, अन्यथा...

Teacher's Day Special : प्रत्येक व्यक्तीचे पहिले शिक्षक हे त्याचे पालक असतात. पण पालकांनंतर सर्वच जण शिक्षकांना आपला सर्वात मोठा गुरू मानतो.

Shraddha Thik

Chanakya Niti :

प्रत्येक व्यक्तीचे पहिले शिक्षक हे त्याचे पालक असतात. पण पालकांनंतर सर्वच जण शिक्षकांना आपला सर्वात मोठा गुरू मानतो. कबीर दासांनी गुरूंचे गोविंद असे वर्णन केले आहे, कारण गुरूशिवाय चांगल्या भविष्याची कल्पना करता येत नाही. गुरूशिवाय शिष्याला ज्ञान मिळणे अशक्य आहे. योग्य आणि अयोग्य यातील फरक गुरूमुळेच कळतो.

अशा स्थितीत चाणक्य म्हणतात की, शिष्याने आपल्या गुरूंप्रती जेवढी भक्ती केली पाहिजे, तेवढेच आपल्या शिष्यांना योग्य मार्ग दाखविणे हे गुरुचे कर्तव्य बनते. आयुष्यात करिअरच्या (Career) दृष्टिने चुकिच्या वागणूकीच्या गुरूचा कधी त्याग करावा हे चाणक्यांनी (Chanakya) सांगितले आहे.

अज्ञानी शिक्षक

चाणक्याच्या मते, अज्ञानी असलेल्या गुरूचा त्याग करणे कधीही चांगलेच असते. गुरू शिष्याला मार्गदर्शन करतात, योग्य शिक्षणाने चांगले-वाईट भेद करायला शिकवतात, पण

चाणक्याच्या मते शिक्षकांनाच (Teachers) जर ज्ञान नसेल तर तो शिष्याचे भले कसे करणार. अशा गुरूकडून शिक्षण घेतल्याने पैशांची हानी तर होतेच पण त्यामुळे तुमचे संपूर्ण भविष्यही उद्ध्वस्त होऊ शकते, त्यामुळे अशा गुरूला तत्काळ सोडून दिलेले बरे. गुरु आणि शिष्य यांच्यातील बंध विश्वासाने बांधलेले असतात.

चाणक्यांच्या मते, एक अज्ञानी शिक्षक देशासाठी धोक्यापेक्षा कमी नाही. असे गुरू देशाच्या भवितव्याशी खेळतात, अशा गुरूंचे भान ठेवणे गरजेचे असून त्यांच्यापासून अंतर राखणे चांगले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आज मराठा क्रांती मोर्चा कडून सातारा बंदची हाक

Building Collapse: इमारत दुर्घटनेप्रकरणी मालकाला अटक, उपायुक्तांसह ५ अधिकाऱ्यांचे तडकाफडकी निलंबन

Filmmaker Death : तेजस्वी तारा हरपला! राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपट निर्मात्याचे निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

HDFC बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा! कोट्यवधी खातेदारांचा 'ईएमआय' कमी होणार; जाणून घ्या नवीन दर

कोणत्याही क्षणी ‘या’ स्मार्टफोन्सवर WhatsApp बंद होणार; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT