Chanakya Niti On Women
Chanakya Niti On Women Saam Tv
लाईफस्टाईल

Chanakya Niti On Women : या स्वभावाच्या स्त्रियांपासून नेहमीच राहा लांब, चुकूनही नातं जोडलं तर आयुष्य होईल उद्धवस्त...

कोमल दामुद्रे

Chanakya Niti : अर्थशास्त्रज्ञ आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात मानवी जीवनाशी संबंधित सर्व पैलूंचा उल्लेख केला आहे. यशस्वी वैवाहिक जीवनासाठी त्यांनी आपल्या नीतिमत्तेतून अनेक सूचना दिल्या आहेत.

चाणक्य नीतीमध्ये पती-पत्नीने नात्यात (Relation) गोडवा टिकवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत आणि कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याचाही उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय व्यक्तीचा स्वभाव, गुण याविषयी त्यांनी सविस्तरपणे सांगितले आहे.

यासोबतच आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात स्त्रियांच्या काही स्वभावाबद्दल सांगितले आहे. आचार्य चाणक्य यांच्या मते, अशा स्वभावाच्या स्त्रियांशी व्यक्तीने सावधगिरी बाळगली पाहिजे, अन्यथा जीवनातील सर्व काही उद्ध्वस्त होऊ शकते. चला जाणून घेऊया त्या स्वभावांबद्दल.

1. स्वभाव

चाणक्य (Chanakya) नीतीमध्ये स्त्रियांच्या कर्मकांडांना विशेष महत्व दिले आहे. चाणक्याने नीतिशास्त्रात लिहिले आहे की, चांगली वागणूक असलेली स्त्री घराला स्वर्ग बनवते. ती आपल्या पती आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची काळजी घेते. दुसरीकडे, ज्या स्त्रीला चांगले वागणूक नसते ती घराला उद्घवस्त करते

2. सौंदर्य हेच सर्वस्व

आचार्य चाणक्य यांच्या मते स्त्रीचे सौंदर्य हे सर्वस्व नाही. जर एखाद्या पुरुषाने स्त्रीला तिच्या सौंदर्याने पारखून तिच्याशी लग्न केले तर या संपूर्ण जगात त्याच्यापेक्षा मूर्ख कोणी नाही. म्हणूनच लग्नासाठी स्त्रीच्या सौंदर्याऐवजी तिची संस्कृती, तिचा स्वभाव, तिची वैशिष्ट्ये, तिचे गुण आणि अवगुण जाणून घेतले पाहिजेत.

3. सुसंस्कृत स्त्री (Women)

आचार्य चाणक्य म्हणतात की, जर एखादी स्त्री सुंदर नसेल, परंतु तिचे आचार चांगले असतील तर पुरुषाने तिच्याशी लग्न केले पाहिजे. कारण हीच स्त्री त्याचे भविष्य सुखी करेल. अशी स्त्री त्याला एक उत्तम कुटुंब घडवते.

4. मनाचे सौंदर्य

आचार्य चाणक्य यांच्या मते मनाचे सौंदर्य पाहिले पाहिजे आणि शरीराचे सौंदर्य अजिबात पाहू नये. जी स्त्री मनाने सुंदर नाही आणि कुटुंबाचे महत्त्व समजत नाही, तिच्यामुळे केवळ लग्नच नाही तर सर्व नाती तुटतात. अशा महिला धर्महीन असतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Arvind Sawant News | वरळीत पोलिंग एजंटचा मृत्यू, अरविंद सावंत यांचा गंभीर आरोप!

Nashik News: भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू, इगतपुरीमधील धक्कादायक घटना

SSC Result News | 10 वीचा निकाल कधी? शिक्षणमंत्री Deepak Kesarkar यांनी दिली माहिती

Abhijit Bichukale: कल्याणमध्ये फेर निवडणूक घ्या, अन्यथा आमरण उपोषण; अभिजीत बिचुकलेंचा इशारा

Nagpur News: 'मुलीला चांगलं आयुष्य देऊ शकत नाही', 3 वर्षांच्या चिमुकलीची जन्मदात्या आईनेच केली गळा दाबून हत्या

SCROLL FOR NEXT