Diwali Faral Recipe saam tv
लाईफस्टाईल

Diwali Faral Recipe : फक्त १० मिनिटांत करा ज्वारीच्या पिठाची कुरकुरीत चकली

diwali 2024 recipe: यंदाच्या दिवाळीत तुम्ही वेगवेगळ्या रंगांच्या चकल्या तयार करु शकता. या चकल्या चविला उत्तम आणि पौष्टीक असतील.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिवाळीला आपण सगळेच फराळ तयार करतो. फराळात आपण लाडु, चिवडा, फरसाण, शंकरपाळ्या, करंजी आणि चकली हे फराळाचे पदार्थ तयार करतो. मात्र तेच पदार्थ खावून किंवा तयार करुन तुम्ही कंटाळले असाल तर या दिवाळीत तुम्ही वेगवेगळ्या रंगांच्या चकल्या तयार करु शकता. या चकल्या चविला उत्तम आणि पौष्टीक अशी चकली रेसिपी तुम्ही ट्राय करु शकता. याची रेसिपी सगळ्यात सोपी असणार आहे. चला तर तयार करु यंदाच्या दिवाळीत कलर फूल चकल्या.

चकल्या तयार करण्याचे साहित्य

बाजरीची चकली

बाजरीचे पीठ – १ कप

रवा – १/४ कप

बेसन – १/४ कप

लाल तिखट – १/२ टीस्पून

कॅरम सीड्स – १/२ टीस्पून

मीठ चवीनुसार

पाणी

रेसिपी

सर्वप्रथम बाजरीचे पिठ, रवा, बेसन, लाल तिखट, कॅरम सीड्स, मीठ हे साहित्य एका परातीत एकत्र करुन घ्या. मग त्यात थोडे-थोडे पाणी मिक्स करुन पीठ चांगले मळून घ्या. आता चकलीचा साचा घ्या आणि चकल्या पाडून घ्या. या चकल्या तुम्ही बेक किंवा तेलात तळू शकता. अशा सोप्या प्रकारे तुम्ही बाजरीच्या चकल्या तयार करु शकता.

पालक चकली

पालक पेस्ट – १ कप

ज्वारीचे पीठ – १ कप

तांदळाचे पीठ – १ कप

लसूण पेस्ट – १/२ चमचा

लाल मिरची पावडर – १ चमचा

अनारदाना पावडर (डाळिंबाच्या सुकलेल्या दाण्यांची पावडर) – १ चमचा

तेल (गरम मोहन) – २ चमचे

तीळ – २ चमचे

जिरे (कुटून) – १ चमचा

मीठ – चवीनुसार

तेल चकली तळण्यासाठी

पालक चकली तयार करण्याची कृती

सर्वप्रथम तुम्ही पालक स्वच्छ धुवून घ्या. हा पालक पाण्यात टाकून उकळून मग त्याची पेस्ट तयार करा. आता एक परात घ्या. परातीत लक पेस्ट, ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ, लसूण पेस्ट, तीळ, जिरे, लाल मिरची पावडर, अनारदाना पावडर (डाळिंबाच्या दाण्यांची पावडर) एकत्र करा. आता याचे पीठ मळून तयार करा.

पीठ जास्त घट्ट मळू नका. आता चकलीचा साचा घ्या आणि चकल्या पाडून घ्या. या चकल्या तुम्ही बेक किंवा तेलात तळू शकता. अशा सोप्या प्रकारे तुम्ही बाजरीच्या चकल्या तयार करु शकता.अशा प्रकारे तुम्ही मध्यम आचेवर चकल्या तयार करुन घ्या. चला तयार झाल्या तुमच्यासाठी स्पेशल कुरकुरीत चकल्या.

Writtern By: Sakshi Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: निलेश राणे घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

Chandrapur News: अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपमध्ये, कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार

Ramdas Athawale : आरपीआयला किमान 2-3 जागा द्या, आठवलेंची महायुतीकडे मागणी

Dhanteras 2024: धनत्रयोदशीला सोनं खरेदी करताय? शुभ मुहूर्त आताच नोट करून ठेवा

Shivani Naik : नाकात नथ केसात गजरा; फुलून दिसतोय शिवानीचा चेहरा हसरा

SCROLL FOR NEXT