Success Story saam tv
लाईफस्टाईल

Success Story: चक दे मनाली! जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तिने घातली यशाला गवसणी

Success Story : व्यक्तीच्या मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर तो कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो असं म्हणतात. यायचं एक उदाहरण म्हणजे मनाली शेळके. डाऊन सिंड्रोमने ग्रस्त असून तिने जिद्द सोडली नाही.

Neeta Mali, Surabhi Jayashree Jagdish

असाध्य ते साध्य करणाऱ्या मनाली शेळकेंची कबणी म्हणजे जणू सत्यात उतरलेले सुंदर स्वप्न ! मनोज आणि निलीमा शेळके हे मनालीचे आईबाबा ! तिच्या जन्माबरोबर घरी आणि आजोळी आनंदी आनंद झाला. मनालीचा मोठा भाऊ (कुणाल) बरोबर खेळायला एक छोटी परीराणी घरी आल्याची आनंदाची लाट लवकरच ओसरली, घरात चितंचे वातावरण तयार झालं. कारण मनाली सर्वसामान्य मुलांसारखी नव्हती. डॉक्टरांनी सांगितलं, तिला डाउन सिंड्रोम, म्हणजेच शारीरिक मानसिकदृष्ट्या मंदत्व आहे.

विशेष लक्षणांसह मनाली मोठी घेणार, हे ऐकून आईवडील काळजीने व्याकुळ झाले, त्यांना काय करावे सुचेना. मित्रपरिवार, डॉक्टर सर्वांनी धीराचे हात पाठीवर ठेवले. मनालीच्या आईबाबांनी मनाशी निश्चय केला, आता रडून चालणार नाही, हिम्मतीने मनातीला मोठं करायचं. त्यामागे कितीही कष्ट पडले तरी चालतील. आपल्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांनी खऱ्या अर्थाने मनालीला वाढवलं, घडवलं, मोठं केलं.

लहानपणी मनालीला शास्त्रशुद्ध मसाज सुरु केला, त्यासाठी आजीने मसाज प्रशिक्षण घेतलं. घरातील प्रत्येकाने आपापल्या परीने खारीचा वाटा जिद्दीने उचलला. दिवसामागून दिवस वेगाने जात होते. पुण्यातील कामायनी विद्यालयात मनालीचा प्रवेश झाला. शाळा आणि शिक्षक मनालीला प्रेम आणि प्रोत्साहन देत होते. तिचे बाबा दूरदर्शन केंद्रात अभियंता असल्यामुळे त्यांच्या कामाचा व्याप, आणि मुंबई-पुणे अशी धावपळ होती. त्यामुळे मनाली आईच्या सहवासात जास्त होती. मनालीला काय शिकवता येईल, तिच्यात कोणते कलागुण आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी विशेष मुलांना कसं वाढवायचं या संदर्भात वाचन केलं. सुरूवातीला निला कथ्थक नृत्याचा क्लास लावला आणि मनाली कथ्थक शिकू लागली.

या शिक्षणानंतर मनालीने दोन परीक्षाही दिल्या. नृत्यात प्राविण्य मिळू लागले, पण लेखी परीक्षा देणं, मनालीसाठी फारच अवघड होतं. मग तिने पेपर बॅग्ज तयार करण्याचं प्रशिक्षण घेतलं. आत्तापर्यंत तिने १५,००० पेपर बॅग्ज तयार केल्या आहेत. तिच्या शाळेतील शिक्षकांनी, मनालीला पॉवर लिफ्टींगमध्ये आवड निर्माण होऊ शकते, असं सांगितलं. इथून पुढे मनालीच्या गगनभरारीला जणू पंख फुटले. या पंखात बळ आणि आत्मविश्वास देण्याचं काम घर आणि शाळा यांनी केलं.

अर्थात मनालीने सुद्धा भरपूर मेहनन घ्यायला सुरवात केली. राज्यपातळीवर तिने चमकदार कामगिरी केली. तिचा आत्मविश्वास वाढला. प्रयत्न वाढले आणि म्हणूनच राष्ट्रीय पातळीवर विशेष मुलांच्या स्पर्धेत तिने पॉवर लिफ्टींगमधे तिने एक सुवर्णपदक, एक ब्राँझ पदक मिळवलंय.

या यशामुळे मनालीची पैरा ऑलिम्पिकसाठी निवड झाली. अबुधाबीमध्ये झालेल्या विशेष मुलांच्या ऑलिम्पिकमधील तिची कामगिरी पाहून लोकांच्या भुवया उंचावल्या. तिने ४७ किलो वजन उचलून यशाचा गोवर्धन उचलला. या ऑलिम्पिकमधे तिने बेंचप्रेसमध्ये सुवर्णपदक पटकावलं. याशिवाय स्कॉट, डेडलिफ्ट व कंम्बाईन्ड या प्रकारात तीन ब्राँझपदके मिळवली आहेत. ४० पेक्षा अधिक देशातील विशेष स्पर्धक सहभागी झालेल्या २०१९ च्या या ऑलिम्पिकमधे मनालीने भारताचे नाव मोठं केलंय.

अनेक पुरस्कार आणि मानसन्मानांनी मनालीला गौरवण्यात आलंय. डाउन सिंड्रोम असलेल्या मनालीचं हे यश सहजसोपं नाही. त्यामागे तिची कठोर मेहनत आहे. आईबाबा आणि अमेरिकेत असणारा तिचा कुणालदादा या सगळ्यांचा तिच्या यशात वाटा आहेच. असाध्य ते साध्य करणाऱ्या मनालीचे यश आणि तिची जिद्द मनात कायमचं घर करणारी आहे.

नुतन गुळगुळे फाऊंडेशन ही दिव्यांगासाठी कार्यरत आहे. या फाऊंडेशनविषयी तुम्हाला माहिती हवी असल्यास तुम्हीही जोडले जाऊ शकता. संकेतस्थळ https://www.nutanfoundation.org/

संपर्क- 9920383006

इमेल आयडी- nutangulgulefoundation@gmail.com

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT