Cervical cancer saam tv
लाईफस्टाईल

Cervicitis Warning: या कारणांनी येते गर्भाशयाच्या मुखाला सूज; लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास वाढू शकतो धोका

Causes of cervical inflammation: महिलांमध्ये सर्वाइकल सूज म्हणजेच Cervicitis ही सामान्य पण दुर्लक्षित समस्या आहे. इन्फेक्शन, हार्मोनल बदल आणि अॅलर्जीमुळे हा त्रास होऊ शकतो. योग्य वेळी लक्षणं ओळखून उपचार न घेतल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

आजच्या धावपळीच्या आयुष्यात महिला त्यांच्या आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष करतात. खासकरून इंटिमेट हेल्थबाबत बोलताना अजूनही संकोच वाटतो आणि याच कारणामुळे अनेक महिला वेळेवर डॉक्टरांकडे जात नाहीत. अनेकदा छोट्या वाटणाऱ्या समस्या नंतर गंभीर स्वरूप धारण करतात. अशाच एका महत्त्वाच्या समस्येबाबत तज्ज्ञांनी इशारा दिला आहे.

ओनली माय हेल्थ वेबसाईटला माहिती देताना मुंबईतील होली फॅमिली हॉस्पिटलच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. मिशेल विक्टर यांनी सर्वाइकलला येणारी सूज म्हणजेच Cervicitis या विषयावर महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या मते, महिलांमध्ये ही समस्या सामान्य असली तरी तिच्यावर योग्य वेळी उपचार होणं अत्यंत गरजेचं आहे.

सर्विक्सला सूज कशी होते?

सर्विक्स हा वजायनाला युटेरसशी जोडणारा भाग आहे. या भागात सूज आली तर त्याला सर्वाइकल इंफ्लेमेशन किंवा Cervicitis असं म्हटलं जातं. अनेकदा याची लक्षणं खूप सौम्य असतात. त्यामुळे महिलांना वेळेवर याची जाणीव होत नाही.

इन्फेक्शनमुळे होणारी समस्या

डॉ. मिशेल यांच्या मते, क्लॅमिडिया आणि गोनोरिया सारखे वजायनाचे संसर्गजन्य आजार (STIs) हे सर्वाइकलला सूज येण्याचं एक मोठं कारण असू शकतात. या आजारांची लक्षणं स्पष्ट नसली तरी ते सर्विक्समध्ये सूज निर्माण करतात.

बॅक्टेरियल वेजिनोसिसचा धोका

वजायनामध्ये चांगले आणि वाईट बॅक्टेरियांचं संतुलन असतं. हे संतुलन बिघडलं तर बॅक्टेरियल वेजिनोसिस होऊ शकतो. यावर वेळेवर उपचार न झाल्यास सर्वाइकल इंफ्लेमेशन होण्याची शक्यता वाढते.

अॅलर्जीमुळे होणारा त्रास

काही महिलांना कॉन्ट्रासेप्टिव्ह, स्पर्मिसाइड्स, डूशिंग किंवा सुगंधी इंटिमेट प्रोडक्ट्स वापरल्याने अॅलर्जी होऊ शकते. त्रास होत असूनही हे प्रोडक्ट्स सतत वापरल्यास सर्विक्समध्ये सूज येण्याची शक्यता वाढते.

हार्मोनल बदलांचाही परिणाम

काही महिलांमध्ये हार्मोन्सचं असंतुलन हे देखील सर्वायकलला सूज येण्याचं एक कारण ठरतं. विशेषतः इस्ट्रोजेनचं प्रमाण कमी किंवा जास्त झाल्यास हा त्रास होतो. यामुळे सूज येऊ शकते. पीरियड्स अनियमित होणं किंवा चेहऱ्यावर अनावश्यक केस येणं ही देखील लक्षणं असू शकतात.

सर्वायकलला सूज आल्याची लक्षणं

  • वजायनातून जास्त प्रमाणात डिस्चार्ज होणं

  • दुर्गंधी येणं

  • लैंगिक संबंधांदरम्यान वेदना होणं

  • पेल्विक भागात सतत दुखणं

  • लघवी करताना जळजळ होणं

  • पीरियड्सच्या मध्ये रक्तस्राव होणं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT