Chandra Grahan October 2023:
Chandra Grahan October 2023: saam tv
लाईफस्टाईल

Chandra Grahan 2023 : खंडग्रास चंद्रग्रहण... कोजागरी पौर्णिमा साजरी करावी का? (पाहा व्हिडिओ)

विकास काटे

Chandra Grahan October 2023 : कोजागरी पौर्णिमा आणि त्यानंतर मध्यरात्री खंडग्रास चंद्रग्रहण असले तरी नागरिकांनी काेजागरी आनंदाने साजरी करावी तसेच चंद्रग्रहणही पाहावे असे आवाहन खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण (Damodar Krishnaji Soman) यांनी केले आहे. पावसाळ्यानंतर येणारी हि पहिलीच पाेर्णिमा असल्याने धुलीकण नसतात त्यामुळे चंद्रग्रहण पाहा निरीक्षण करा असेही साेमण यांनी नमूद केले. (Maharashtra News)

दा. कृ. साेमण म्हणाले आज (शनिवार) मध्यरात्री आश्विन पौर्णिमा असल्याने कोजागरी पौर्णिमा आहे. या दिवशी मध्यरात्री लक्ष्मी विचारते की " कोण जागा आहे ? अशी श्रद्धा आहे. याचा अर्थ निद्रेतून जागा नव्हे, तर अज्ञान, आळस, अस्वच्छता, अनीती यांच्या निद्रेतून कोण जागा आहे? "जे जागे आहेत त्यांच्यावर ती प्रसन्न होते असे मानले जाते.

आज खंडग्रास चंद्रग्रहण आहे. मध्यरात्रीनंतर एक वाजून पाच मिनीटांनी चंद्रग्रहणास प्रारंभ होईल. रात्री 1 वाजून 44 मिनीटास ग्रहणमध्य होईल. त्यावेळी 6 टक्के चंद्रबिंब पृथ्वीच्या छायेत येईल. ग्रहण रात्री 2 वाजून 23 मिनीटांनी सुटेल. नागरिकांनी आज रात्री कोजागरी आनंदाने साजरी करा. तसेच आकाशातील चंद्रग्रहणही (khandgrass chandra grahan) पाहा असे साेमण यांनी नमूद केले.

यापूर्वी 2004 मध्ये कोजागरीच्या दिवशी चंद्रग्रहण झाले होते. पुढच्या वर्षी 2024 मध्ये एकही ग्रहण भारतातून दिसणार नाही. 7 सप्टेंबर 2025 चे खग्रास चंद्रग्रहण भारतातून दिसेल. कोजागरीच्या दिवशी खग्रास चंद्रग्रहण 18 ऑक्टोबर 2032 रोजी होईल असेही खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंमुळेच गेली 1999मध्ये युतीची सत्ता, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

Sushma Andhare : 'लाव रे तो व्हिडिओवर' सुषमा अंधारेंची तिखट प्रतिक्रिया; बाळासाहेबांचं नाव घेत राज ठाकरेंना सुनावलं

Horoscope: 1 वर्षानंतर सूर्य होणार शुक्राच्या राशीत विराजमान, 3 राशींचा होणार फायदा; या 2 राशींचे लोक राहा सावध

PoK तापलं; आंदोलनकर्ते आणि पोलीस कर्मचारी आमनेसामने; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, १०० जण जखमी

RCB vs DC: बेंगळुरूचा 'चॅम्पियन' गेम; पॉईंट्स टेबलमध्ये घेतली भरारी

SCROLL FOR NEXT