Students eagerly checking their CBSE Class 10 results online on official websites. saam tv
लाईफस्टाईल

CBSE 10th Result 2026: विद्यार्थ्यांनो! १०वीचा निकाल कुठे कराल चेक; कोण-कोणत्या वेबसाईटवर मिळेल रिझल्ट?

How To Check CBSE 10th Result: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) २०२६ चा इयत्ता १०वीचा निकाल कधीही जाहीर करू शकते. जवळपास २५ लाख विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आता संपणार आहे.

Bharat Jadhav

  • CBSE १०वीचा निकाल लवकरच जाहीर होण्याची शक्यता

  • निकाल अधिकृत वेबसाइट आणि DigiLocker वर उपलब्ध होणार

  • वेबसाइट क्रॅश टाळण्यासाठी पर्यायी पर्याय उपलब्ध

CBSE दहावीचा निकाल कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो. जवळपास २५ लाख विद्यार्थ्यांनी आपल्या निकालाची प्रतीक्षा आहे. दरम्यान निकाल पाहताना एकाचवेळी अनेक ठिकाणी पोर्टल सुरू झाल्यानंतर वेबसाइट क्रॅश होत असते. वेबसाइटचं सर्व्हर डाऊन होत असते. त्यामुळे विद्यार्थांनो तुम्ही तुमचा अधिकृत साइटसह अजून कुठे पाहू शकता त्याची माहिती जाणून घ्या.

विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमचा निकाल DigiLocker वर देखील तपासू शकता. यासाठी तुम्हाला डिजिलॉकरवर आपलं खातं उघडावे लागेल. डिजीलॉकरने विद्यार्थ्यांना त्यांची खाती सक्रिय करण्याचा सल्ला देणारी सूचना आधीच जारी केली आहे. यावर्षी अंदाजे २५ लाख विद्यार्थी त्यांच्या निकालाची वाट पाहत आहेत.

निकालाच्या वेळी जास्त वेबसाइटवर लोड आल्यास अनेकदा सर्व्हर संथ गतीने चालत असते. यामुळे डिजीलॉकरने विद्यार्थ्यांना त्यांचे अकाउंट आधीच आगाऊ सक्रिय करण्याचे आवाहन केले आहे. जेणेकरून ते कोणत्याही विलंबाशिवाय त्यांच्या डिजिटल गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे डाउनलोड करू शकतात.

APAAR आयडी नसलेले विद्यार्थी अकाउंट तयार कसे करणार?

APAAR आयडी नसलेल्या विद्यार्थ्यांनी घाबरू नये! ते त्यांच्या शाळेने दिलेल्या ॲक्सेस कोड आणि क्रेडेन्शियल्सचा वापर करून cbseservices.digilocker.gov.in वर आपले अकाउंट तयार करू शकतात. ज्यांच्याकडे APAAR आयडी आहे, त्यांना त्यांच्या गुणपत्रिका थेट 'Issued Documents' सेक्शनमध्ये मिळतील.

डिजीलॉकरवर अकाउंट कसे सक्रिय करावे?

cbseservices.digilocker.gov.in वर जा.

'Get Started' वर क्लिक करा.

शाळेतून मिळालेल्या एक्सेस कोड आणि आपले डिटेल्स भरा.

मोबाईल नंबर आलेल्या ओटीपीवरून व्हेरिफाय करा. त्याची पडताळणी करा.

अकाउंट एक्टिव्ह होईल आणि रिझल्ट येताच तुम्हाला मार्कशीट मिळेल.

दरम्यान निकाल तपासण्यासाठी तुम्हाला या पाच गोष्टींची आवश्यकता असेल, रोल नंबर, स्कूल नंबर(School Number) , प्रवेशपत्र आयडी (Admit Card ID), जन्मतारीख (Date of Birth) , सुरक्षा पिन.

या वेबसाइट्स आणि ॲप्सवरही निकाल दिसेल

अधिकृत वेबसाइट cbse.gov.in व्यतिरिक्त तुम्ही results.nic.in, उमंग ॲप आणि SMS/IVRS सुविधेद्वारे देखील तुमचे गुण तपासू शकता. मे महिन्यात होणाऱ्या सत्र २ परीक्षेचा निकाल CBSE लवकरच जाहीर केला जाणार आहे. मागील अनेक वर्षांच्या ट्रेंडनुसार १०वीचा निकाल एप्रिलच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवड्यात जाहीर होऊ शकतो. दरम्यान, सीबीएसई बोर्डाचा १२वीचा निकाल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मध्य रेल्वे १६८ अतिरिक्त उन्हाळी विशेष रेल्वे सेवा चालवणार

Vaibhav Suryavanshi: ठरलं तर मग...! १५ वर्षांचा वैभव सूर्यवंशी लवकरच टीम इंडियात खेळणार

Honey Chilli Potato Recipe: तोंडाला पाणी सुटेल! घरीच बनवा क्रिस्पी आणि टेस्टी हनी चिली पोटॅटो रेसिपी

Ahilyanagar : भर उन्हाळ्यात आईस्क्रीमचा आस्वाद घेत असाल तर सावधान! कुल्फीत भेसळ, डायबेटिस आणि हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो

UPI वरून चुकीच्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झाले? ही प्रोसेस फॉलो करा अन् लगेच मिळवा पैसे

SCROLL FOR NEXT