अनेकदा कार चालकांसोबत चावी हरवण्याच्या घटना घडतात. चावी अगदी छोटी असल्याने ती झटकन गायब होते, हरवते आणि पटकन सापडत सुद्धा नाही. तर बऱ्याचवेळा असेही होते की, चावी कारमध्येच अडकते आणि कार बंद होते. अशा घटना आतापर्यंत अनेक व्यक्तींसोबत घडल्या आहेत.
चावी कारमध्ये अडकली आणि दरवाजा बंद झाला तर काय करावे आणि काय नाही हे आपल्याला सुचत नाही. अशावेळी बहुतेक व्यक्ती कार गॅरेजमध्ये घेऊन जातात. कार गॅरेजमध्ये नेल्यावर ती लगेचच अनलॉक करणे सोप्पे होते. मात्र जर तुम्ही गॅरेजपासून बरेच लांब असाल तर हा पर्याय आपल्याला वापरता येत नाही.
अशावेळी आपल्याला स्वत: आपलं डोकं वापरून कारचा दरवाजा खोलावा लागतो. काही व्यक्ती दरवाजा तोडण्यापेक्षा काचेची खिडकी तोडण्याचा प्रयत्न करतात. आता तुम्ही सुद्धा अशी घटना अनुभवली असेल तर आम्ही तुमच्यासाठी या परिस्थितीवर मात करणारा एका व्हिडिओ शोधून आणला आहे. या व्हिडिओच्या माध्यातून तुम्ही सुद्धा चावी न वापरता कार अनलॉक करू शकता.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक तरुणी कारच्या बाहेर उभी आहे आणि चावी कारच्या आतमध्ये आहे. कार लॉक झाल्याने ती अनलॉक करण्यासाठी तिने एक चिकटपट्टी वापरली आहे. सुरुवातीला ही तरुणी कारची खिडकी असलेल्या काचेवर काही चिकटपट्ट्या लावते. चिकटपट्ट्या लावल्यावर ती याची एक डिझाइन सुद्धा तयार करते. यावर तिने चौरस आणि क्रॉसमध्ये चिकटपट्टी लावली आहे.
तसेच यावर पुढे एकावर एक तिन चिकटपट्ट्यालावून तिने कारची काच खाली खेचली आहे. अशा पद्धतीने खिडकीची काच उघडते आणि आपल्याला आतमध्ये अडकलेली चावी घेण्यासाठी मदत होते. चावी घेतल्यावर तुम्ही लगेचच कार अनलॉक करू शकता. तरुणीचा हा कार अनलॉक हॅक्सचा व्हिडिओ @driver_ms_may या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिआवर तुफान व्हायरल होताना दिसतोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.