Budget Friendly Car Saam Tv
लाईफस्टाईल

Sedan cars: दमदार फीचर्स, उत्तम मायलेजसह 10 लाखांपेक्षा कमी किंमतीत घरी आणा फॅमिली कार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Budget Friendly sedan cars:

आजकाल प्रत्येकाच्या घरी कार असणे ही काळाची गरज बनली आहे. पूर्वीच्या काळात लोक लक्झरी म्हणून कार खरेदी करायचे. परंतु आता सर्वजण कार खरेदी करतात. कार खरेदी करताना देखील अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कार असतात. यातील एक प्रकार म्हणजे सेडान कार. अनेकांना सेडान कार घ्यायची असते. आम्ही तुम्हाला बजेटमधील सेडान कारची माहिती देणार आहोत.

कार खरेदी करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे बजेट. योग्य बजेटमध्ये उत्तम कार सर्वांनाच घ्यायची असते. कार खरेदी करताना तुमचे बजेट 10 लाख रुपये असेल तर या कार तुम्ही नक्कीच घेऊ शकतात.

1. मारुती डिझायर (Maruti Dzire)

मारुतीची डिझायर ही भारतात सर्वाधिक विकली जाणारी कार आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी दोन्ही पर्यांयामध्ये उपलब्ध आहे. CNG कार प्रति किलो 3.12 किमी मायलेज देते. या कारमध्ये रिव्हर्स पार्किंग सेन्सर, ड्युअल एअरबॅग्ज, अँटी थेप्ट सिक्युरीटी सिस्टीम, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, स्पीड अलर्ट असे फिचर्स आहेत. या कारची किंमत 6.24 लाख ते 9.17 लाख रुपये आहे.

2. मारुती सियाझ (Maruti ciaz)

मारुतीची सियाझ कार ही आराम देणारी कार आहे. या कारमध्ये सिग्मा, डेल्टा, झेटा हे व्हेरियंट उपलब्ध आहे. या कारची किंमत 10 लाख रुपये आहे. डेल्टा कारची किंमत 9.63 लाख रुपये आहे. तर झेटा व्हेरियंटची किंमत 9.99 लाख रुपये आहे.

3. टाटा टिगोर (Tata tigor)

टाटा कंपनीची टाटा टिगोर ही उत्तम कार आहे. ही कार पेट्रोल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक या तीन पर्यांयामध्ये उपलब्ध आहे. कारमध्ये CNG टँकसह 35 लीटरची पेट्रोल टाकी उपलब्ध आहे. कारमध्ये पंक्चर रिपेअर किट, ABS आणि EBD , रियर पार्किंग सेन्सर, ड्यूअल एअरबॅग्ज, स्पीड ऑटो डोअर लॉक असे फिचर्स आहेत. या कारची किंमत 5.99 लाख ते 7.39 लाख रुपये आहे.

4. ह्युंदाई ऑरा (Honda Aura)

ह्युंदाई ऑरा ही अत्यंत कॉम्पॅक्ट सेडान कार आहे. ही कार सीएनजी, पेट्रोल डिझेल अशा तिन्ही पर्यांयामध्ये उपलब्ध आहे. या कारमध्ये एकूण 11 पर्याय आहे. कारमध्ये चाइल्ड सीट अँकर, सीट बेल्ट रिमाइंडर, स्पीड सेन्सिंग ऑटो डोअर लॉक असे फिचर्स आहेत. या कारची किंमत 6.08 लाख ते 9.50 लाख रुपये आहे.

5. ह्युंदाई व्हर्ना (Hyundai Verna)

ह्युंदाई व्हर्ना या कारची भारतात सर्वाधिक मागणी आहे. ही कार पेट्रोल इंजिनसह येते. या कारमध्ये रिव्हर्स पार्किंग सेन्सर, डे नाईट मिरर, इमोबिलायझर, सीट बेल्ट प्री टेन्शनर्स, इम्पॅक्ट सेन्सिंग डोअर लॉक, ड्युअल एअरबॅग्ज असे अनेक फिचर्स आहे.

6. होंडा अमेझ (Honda Amaze)

होंडा अमेझ ही कार पेट्रोल आणि डिझेल या दोन पर्यांयासह उपलब्ध आहे. या कारमध्ये ABS आणि EBD, स्पीड अलर्ट, रिअर पार्किंग सेन्सर, एअरबॅग्ज असे अनेक फिचर्स आहेत. या कारची किंमत 6.62 लाख रुपये ते 9.01 लाख रुपये आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

Maharashtra News Live Updates: दोन हजारांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक

SCROLL FOR NEXT