Car Care Tips And Tricks
Car Care Tips And Tricks Saam Tv
लाईफस्टाईल

Car Care Tips And Tricks : AC ऑन करुन कार चालवल्यास मायलेजवर परिणाम होतो ? यात कितीही आहे तथ्य...

कोमल दामुद्रे

Car Care Tips : आपल्यापैकी अनेकांना कार चालवण्याची किंवा स्वत:ची कार घेण्याची इच्छा असेलच. कार घेताना किंवा कार चालवताना अनेकांचा गोंधळ उडतो. कार चालवताना अनेकांना खिडकीत बसून आनंद लुटायचा असतो. तर काहींना त्यात सुरु असणाऱ्या खंडगार एसीचा आनंद लुटायचा असतो.

अनेकांना कार (Car) चालवताना त्याचे मायलेज कसे वाढवता येईल हा देखील प्रश्न असतो. यासाठी लोक अनेक प्रकारचे उपाय करतात. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की कारमध्ये एसी चालवल्याने त्याच्या मायलेजवर परिणाम होतो. याशिवाय गाडी चालवताना गाडीची काच उघडली तर गाडी कमी मायलेज देते, असेही सांगितले जाते. या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत का?

याबाबत अनेक प्रकारचे प्रश्न लोकांमध्ये आहेत. उन्हाळा सुरु झाल्यानंतर अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतात की Ac ऑन करुन कार चालवल्यास धोका निर्माण होऊ शकतो का जाणून घेऊया त्याबद्दलच्या टिप्स (Tips)

1. खिडक्या उघडल्याने कारच्या मायलेजवर परिणाम होतो का?

जर तुम्ही हायवेवर (Highway) जास्त वेगाने कार चालवत असाल. या काळात जर तुम्ही खिडक्या उघडल्या तर या स्थितीत बाहेरून जोराचा वारा कारच्या आत येईल आणि तो कारला मागील बाजूस कव्हर करेल आणि इंजिन गाडीला पुढे ढकलेल. अशा स्थितीत, कारच्या आत भरपूर इंधनाचा वापर होईल. यामुळे तुमची कार खूपच कमी मायलेज देईल.

2. एसी वापरल्याने कारच्या मायलेजवर परिणाम होतो का ?

गाडी चालवताना गाडीतील एसी चालू केल्यास याचा थेट परिणाम तुमच्या कारच्या मायलेजवर होतो. जेव्हा AC सुरू होतो, तेव्हा इंजिनची शक्ती कॉम्प्रेसर फिरवण्यासाठी वापरली जाते. यामुळे इंजिन जास्त इंधन वापरते. हवामान नियंत्रण असलेल्या एसी कारमध्ये एअर कंडिशनर वापरल्याने मायलेजवर फारसा परिणाम होत नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Petrol Diesel Price: मुंबईसह पुण्यातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा आजच्या किंमती

Sleeping Time: दिवसाला किती तास झोप घ्यावी?

Beetroot Dosa Recipe : सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा बीट डोसा; रंग पाहून लहान मुलं देखील ताव मारतील

Lok Sabha Election |अबब! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात 9 हजार कोटींचा मुद्देमाल जप्त!

SCROLL FOR NEXT