Corona Virus saam tv
लाईफस्टाईल

Coronavirus: कोरोनाच्या विषाणूने कॅन्सरवर होणार उपचार, नवीन संशोधनाने डॉक्टरही हैराण

Corona Virus: काही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोविड विषाणू कॅन्सरच्या उपचारांमध्ये उपयुक्त ठरू शकतो. याबाबत एक अभ्यास केला, ज्याच्या परिणामांमुळे संशोधकांना आशा निर्माण झालीये.

Surabhi Jayashree Jagdish

COVID-19 Impact: गेल्या ४ वर्षांपूर्वी कोरोनाने थैमान घातलं होतं. या एका व्हायरसने अनेकांचे बळी घेत घरं उद्धवस्त केली. मात्र आता कोरोनाबाबत एक सकारात्मक गोष्ट समोर आली आहे. काही डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कोविड विषाणू कॅन्सरच्या उपचारांमध्ये उपयुक्त ठरू शकतो.

बऱ्याच कॅन्सरच्या रुग्णांमध्ये कोविड झाल्यानंतर त्यांच्या ट्यूमरचा आकार कमी झाला. हे पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं आणि त्यांनी याबाबत एक अभ्यास केला, ज्याच्या परिणामांमुळे संशोधकांना आशा निर्माण झालीये.

कोरोनामुळे कॅन्सरच्या ट्यूमरचा आकार झाला कमी?

कोरोना आणि कॅन्सरशी संबंधित हे संशोधन नॉर्थवेस्टर्न मेडिसिन कॅनिंग थोरॅसिक इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात आलं. ते नोव्हेंबरमध्ये जर्नल ऑफ क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशनमध्ये प्रकाशित होणार आहे. कोरोनाच्या काळात, या विषाणूमुळे आजारी असलेल्या लोकांचे ट्यूमर कमी झाल्याचं किंवा हळूहळू वाढल्याचं दिसून आलं.

यासंबंधी युनिवर्सिटीचे प्रमुख अंकित भरत म्हणाले, 'रुग्ण खूप आजारी असल्याने हे योग्य आहे की नाही हे आम्हाला माहीत नाही. असं घडलं की रोगप्रतिकारक शक्ती इतकी एक्टिव्ह झाली की त्यामुळे कॅन्सरच्या पेशीही मारण्यास सुरुवात झाली?

इम्यून सिस्टमला मदत करणार कोरोना

काही प्रकरणांचा अभ्यास केल्यानंतर, डॉक्टरांनी त्यांच्या टीमसह याबद्दल अधिक माहिती गोळा करण्यासाठी अभ्यास केला. डॉ. भरत आणि त्यांच्या टीमने संशोधन केलं की, जेव्हा SARS-CoV-2 शरीरात असतो तेव्हा शरीरातील मोनोसाइट पेशी वेगळ्या पद्धतीने कार्य करतात. सामान्य परिस्थितीत, मोनोसाइट्स रक्तामध्ये फिरतात आणि जेव्हा कोणतीही खराब पेशी किंवा धोका आढळतो तेव्हा ते सावध होतात.

काही मोनोसाइट्स कॅन्सरशी लढणाऱ्या पेशी ट्यूमरमध्ये घेऊन जातात. परंतु कॅन्सरच्या पेशी कधीकधी मोनोसाइट्सची फसवणूक करतात. SARS-CoV-2 व्हायरस उपस्थित असल्यास कॅन्सरच्या पेशी लपवू शकत नाहीत आणि इम्युनिटी सहजपणे कॅन्सरच्या पेशी शोधू शकते.

डॉक्टरही झाले हैराण

अभ्यासातून असं दिसून आलंय की, कोविड-19 व्हायरसचा आरएनए एक युनिक रोगप्रतिकारक पेशी तयार करतो जो कॅन्सरशी लढू शकतो. या पेशीनंतर ट्यूमरच्या आत असलेल्या कॅन्सरच्या पेशी नष्ट करू शकतात. डॉक्टरांना ही माहिती खूप उपयुक्त वाटतेय कारण त्यातून रोगप्रतिकारक पेशी निर्माण करणारे उपचार तयार केले जातात.

डॉक्टर अंकित यांनी सांगितलं की, मेलेनोमा, फुफ्फुस, ब्रेस्ट आणि कोलोन कॅन्सरच्या उपचारात मदत होऊ शकते. डॉक्टर म्हणाले, 'हे खूप आश्चर्यकारक आहे की, ज्या संसर्गामुळे एवढा विनाश केला तो कॅन्सरशी लढायला मदत करू शकतो.'

औषध बनण्याची शक्यता आहे

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, यापासून एक औषध तयार केलं जाऊ शकतं जे कॅन्सरवर मदत करणार आहे. डॉक्टर भरत यांनी स्पष्ट केलंय की, कॅन्सरच्या पेशी या रोगप्रतिकारक पेशींना प्रतिकार करू शकत नाहीत. ज्या रुग्णांना इम्युनोथेरपीचा प्रतिकार होतो त्यांच्यासाठी हे उपयुक्त ठरणार आहे. या प्रकरणांमध्ये, इम्युनोथेरपीनंतर कॅन्सर परत येतो कारण त्याच्या पेशी स्वतःच बदलतात. कोविड व्हायरस नैसर्गिक किलर पेशी तयार करतात जे कॅन्सरच्य पेशी मारण्यासाठी प्रभावी असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT