vitamin deficiency sleep  google
लाईफस्टाईल

Cancer: अचानक ताप अन् थकवा जाणवतो? ही कॅन्सरची लक्षणे नाहीत ना? डॉक्टरांनी दिली महत्वाची माहिती

Early Symptoms: अचानक ताप, सतत थकवा आणि वजन कमी होणे ही कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे असू शकतात. ही चिन्हे दुर्लक्षित न करता वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Sakshi Sunil Jadhav

तुम्हाला जाणवत असेलच की, उन्हाळ्यात शरीराला जास्त पाण्याची गरज असते. मग आपण लगेच पाणी पितो. कारण आपला घसा कोरडा होतो. कधीकधी आपल्याला उचकी लागते. तसेच काही गंभीर आजार असतात. जर त्यांच्यावर वेळेवर उपचार केले नाहीत तर तुम्हाला भविष्यात जीवघेण्या आजाराला सामोरं जावं लागू शकतं.

जर तुम्ही कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजाराची सुरुवातीची लक्षणे दुर्लक्षित करणे धोकादायक ठरू शकते. वेळेवर निदान झालं तर कॅन्सरवर उपचार यशस्वी होण्याची शक्यता वाढते, पण अनेकजण सुरुवातीची चिन्हे नॉर्मल समजून दुर्लक्ष करतात आणि हीच चूक पुढे गंभीर ठरते.

अचानक वजन कमी होणं हे कॅन्सरचे एक महत्त्वाचं लक्षण मानले जातं. कोणताही डाएट किंवा व्यायाम न करता काही महिन्यांत वजन झपाट्याने घटत असेल, तर ते चिंतेचं कारण असू शकतं. शरीरातल्या कॅन्सरच्या पेशी ऊर्जा वापरून वाढतात, त्यामुळे मेटाबॉलिझम बदलतो आणि वजन कमी होतं. त्याचप्रमाणे सतत थकवा जाणवणं सुद्धा गंभीर संकेत असू शकतो. पुरेशी झोप घेतल्यानेही थकवा जात नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

सतत ताप येत असेल तो दुर्लक्षित करु नका. कोणताही संसर्ग नसताना सतत ताप येत असेल, तर शरीरातील रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होत असल्याचे संकेत असू शकतात. कारण रक्ताच्या कॅन्सरमध्ये हे लक्षण सुरुवातीपासून दिसू शकतं. तसेच शरीरात सतत वेदना होणे, विशेषतः स्नायू किंवा सांध्यांमध्ये, हेही धोक्याचं चिन्ह असू शकतं. पाठदुखी, डोकेदुखी किंवा हाडांमध्ये वेदना कायम राहिल्याने त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण काही प्रकारच्या कॅन्सरची ही सुरुवात असू शकते.

टीप: शरीरात दिसणाऱ्या कोणत्याही असामान्य बदलांकडे दुर्लक्ष करू नये. वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि आवश्यक तपासण्या करणे हेच कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासून बचावाचे महत्त्वाचे पाऊल ठरते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FIFA prize money: स्पेन मालामाल! वर्ल्डकप हरूनही मेस्सीच्या अर्जेंटिनावर कोट्यवधींचा पाऊस; प्रत्येक टीमवर फिफाने किती केली पैशांची बरसात?

FIFA World Cup 2026 : फायनल सामन्यात मेस्सीची जादू पडली फिकी; फेरान टोरेसच्या निर्णायक गोलने स्पेनने 16 वर्षांनी जिंकला वर्ल्डकप

IND vs ENG: रोहितचे शतक व्यर्थ; अवघ्या ८ चेंडूंमध्ये सामन्याचा निकाल बदलला; आठ वर्षांनंतर इंग्लंडनं मालिका जिंकली

प्रशासकीय सेवेत मोठे फेरबदल! IAS अधिकारी अन् तहसीलदारांच्या बदल्या; कोणाची कुठे झाली नियुक्ती?

लॉर्ड्सवर हिटमॅनचे वादळ! इंग्लंडविरुद्ध रोहित शर्माचे वादळी शतक, असा पराक्रम करणारा पहिला भारतीय

SCROLL FOR NEXT