Cancer Diet
Cancer Diet Saam Tv
लाईफस्टाईल

Cancer Diet : कर्करोगाच्या आजारावर मात करण्यासाठी आहारात आजच सामील करा 'या' 5 गोष्टी

कोमल दामुद्रे

Cancer Diet : बदलेल्या जीवनशैलीनुसार व चुकीच्या खाण्यापिण्यानुसार कर्करोगाचा आजार हा सर्वसामान्य झाला आहे. हा जीवघेणा आजार टाळण्यासाठी आपण आपल्या जीवनशैली व आहारात योग्य वेळी बदल करायला हवा.

कॅन्सरसारखा जीवघेणा आजार झाला किंवा तो होऊ नये यासाठी आपण आहारात या पौष्टिक पदार्थांचा समावेश करुन तुम्ही कर्करोगासारख्या गंभीर आजारावर मात करू शकता. चला जाणून घेऊया त्या पदार्थांबद्दल, जे कर्करोगाचा धोका कमी करतात.

1. ब्लूबेरी

Blueberries

ब्लूबेरीचे सेवन कर्करोगाशी लढण्यासाठी खूप उपयुक्त आहे. यामध्ये व्हिटॅमिन-सी, मॅंगनीज, व्हिटॅमिन-के आणि आहारातील फायबर असतात, जे कॅन्सरचा धोका कमी करण्यास मदत करतात. कर्करोगासारख्या प्राणघातक आजारांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही नियमितपणे ब्लूबेरी खाऊ शकता.

2. डाळिंब

pomegranate

डाळिंब हे कर्करोगविरोधी फळ आहे. हे अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहे. हा जीवघेणा आजार टाळण्यासाठी डाळिंब किंवा त्याचा रस रोजच्या आहारात पिऊ शकतो.

3. ब्रोकोली

Broccoli

ब्रोकोलीमध्ये असलेले एन्झाईम कर्करोगाचा धोका कमी करण्यास मदत करते. यातील सल्फोराफेन कर्करोगापासून बचाव करण्यास मदत करते. हा जीवघेणा आजार टाळण्यासाठी तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात ब्रोकोलीचा समावेश करू शकता.

4. टोमॅटो

Tomato

टोमॅटोमध्ये लायकोपीन आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म पुरेशा प्रमाणात आढळतात, जे कॅन्सरशी लढण्यास मदत करतात. हे पेशींचे संरक्षण करते. हा आजार टाळण्यासाठी तुम्ही नियमितपणे टोमॅटोपासून बनवलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करू शकता. आहारात टोमॅटोचा रस, सॉस किंवा भाजी खाऊ शकता.

5. पालक

Spinach

पालकामध्ये बीटा-कॅरोटीन, फायबर, फोलेट आणि इतर जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. जे कॅन्सरपासून (Cancer) बचाव करण्यासाठी उपयुक्त आहे. पालकाचा आहारात अनेक प्रकारे समावेश करता येतो. आपण ते सलाद, सूप किंवा भाजीच्या स्वरूपात समाविष्ट करू शकता.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lok Sabha Election : काँग्रेसचा मोदींवर पलटवार; पाकिस्तान, बिर्याणीचा संबंध जोडत गंभीर आरोप

Expensive country : जगातील ५ सर्वात महागडे देश; राहणे-खाणे आणि फिरायचा खर्च पाहून डोळे फिरतील

Live Breaking News: मुख्यमंत्रीपदाच्या मोहासाठी बाळासाहेबांचे विचार सोडले; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Thane Lok Sabha: कोण होणार ठाण्याचा खासदार? ठाकरे गट आणि शिंदे गट आमने सामने

Salman Khan House Firing Case: सलमान खान गोळीबार प्रकरणात गँगस्टर रोहित गोदाराची एन्ट्री

SCROLL FOR NEXT