spondylosis, Cervical Pain, Health tips ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

सतत एकाच जागी बसल्यामुळे स्पाँडिलायसिसची समस्या उद्भवू शकते का ?

मानदुखीचा त्रास कसा उद्भवतो ते जाणून घ्या.

कोमल दामुद्रे

मुंबई : वाढत्या वयोमानानुसार आपली हाडे कमजोर होऊ लागतात. त्यामुळे हातापाय दुखणे, गुडघे दुखी व कंबर दुखी सारखे दुखणे उद्भवते.

हे देखील पहा -

आपण कामाच्या ठिकाणी एकाच रेषेत बसल्याने आपल्याला थोडे अवघडल्यासारखे होते. हाता पायांना मुंग्या येतात किंवा मान दुखू लागते. त्यामुळे आपल्या मानेची हालचाल शक्यतो जास्त प्रमाणात करता येत नाही. सध्या हा त्रास तरुण पिढीत अधिक पाहायला मिळत आहे. आपल्याला सतत मानेच्या व कंबरेच्यामध्ये दुखण्याचा त्रास होत असेल तर ते सरव्हायकल पेन असू शकते. हा त्रास एकाच जागी ८ ते ९ तास बसल्यामुळे होतो. त्यामुळे कंबरेच्या मागील भागापासून ते मानेपर्यंत हे दुखणे सुरु होते. एकाच ठिकाणी सतत बसल्यामुळे व शरीराची हालचाल न केल्यामुळे या स्पाँडिलायसिसची समस्या (Problems) होते. यामध्ये चक्कर येण्याची लक्षणे अधिक दिसून येतात. हे कसे ओळखावे ते जाणून घेऊया.

मानदुखीची लक्षणे कोणती ?

सतत एकाच जागी बसल्यामुळे आपल्याला मानदुखीचा त्रास सुरु होतो. याचे दुखणे खांद्यावर, पाठीच्या वरच्या भागात, कमरेच्या मध्यभागी कुठेही होऊ शकते.अशा परिस्थितीत चक्कर येणे, मायग्रेन, हलके दुखणे, तीव्र वेदना किंवा झोप येणे अशी लक्षणे दिसू शकतात. खूर्चीवर बसताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

खुर्चीवर बसताना आपल्या पाठीचा कणा अगदी सरळ असावा व पाय जमिनीवर सरळ ठेवा. खुर्चीवर बसताना आपली बसण्याची पध्दत व्यवस्थित असावी. पाठीचा कणा व मान सरळ ठेवा. सतत एकाच स्थितीत बसू नका. लॅपटॉपपासून (Laptop) अंतर ठेवा ज्यामुळे आपली मान वाकली जाणार नाही. दर २० मिनिटांनी आपण शरीराची हालचाल करायला हवी. रोज सकाळी व्यायाम करा. त्यामुळे दिवसभर ऊर्जा मिळेल.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra politic : ६ खासदार फुटल्यानंतर ठाकरेंना आणखी धक्का, अंबादास दानवे महायुतीच्या गोटात, राजकारणात खळबळ

Sambhajinagar : प्ले स्कूलमधील निष्काळजीपणाचा कळस! २३ महिन्यांच्या चिमुकल्याला गंभीर दुखापत, ६ जणांविरोधात गुन्हा

Skin Infection : पावसाळ्यात होऊ शकतं फंगल इन्फेक्शन, सुरुवातीची ही ७ लक्षण ओळखा नाहीतर...

Actor Death : तेजस्वी तारा हरपला; ज्येष्ठ हरहुन्नरी अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टी शोकसागरात

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

SCROLL FOR NEXT