सध्या लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणत्याही वयात मुलांना हार्ट अटॅकच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याचे कारण तपासल्यास आढळते की, सध्याची चुकीची जीवनशैली. अनेकांना सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंतच्या वेळात स्वत: च्या आरोग्यासाठी कष्ट किंवा काही ठरावीक गोष्टी पाळायला सुद्धा आळस येतो आणि याचा परिणाम थेट मोठ्या आजारात रुपांतरीत होतो. पुढे आपण चुकीच्या सवयींमुळे होणाऱ्या हार्ट अटॅकचा धोका टाळण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेल्या मृद्रा कशा करायच्या जाणून घेणार आहोत.
चुकीच्या जीवनशैलीमुळे आर्टरीज ब्लॉक होणे, हार्टवर प्रेशर येणे आणि रक्ताभिसरणात अडथळे निर्माण होणे या समस्या आता सामान्य होत चालल्या आहेत. अशा वेळी प्रश्न येतो की हार्टची काळजी नेमकी कशी घ्यायची? विशेष म्हणजे काही क्षणांसाठी केलेल्या हातांच्या मुद्रांमुळेही हार्टला दिलासा मिळू शकतो, असं योग एक्सपर्टचे म्हणणे आहे.
पहिली मुद्रा
पहिली मुद्रा करण्यासाठी दोन्ही हातांच्या मधल्या बोटांना वाकवायचं असतं. त्यानंतर दुसऱ्या हाताने इंडेक्स फिंगर आणि छोट्या बोटाला पकडायचं. वाकवलेल्या मधल्या बोटांना हलकेच वर-खाली हलवत राहायचं. ही मुद्रा रोज 5 ते 7 मिनिटं केली तरी शरीराला आणि हार्टला फायदा होतो, असं तज्ज्ञ सांगतात.
दुसरी मुद्रा
दुसरी मुद्रा अत्यंत सोपी आहे. यासाठी हाताची एकदा घट्ट मुट्ठी करायची आणि नंतर ती पूर्णपणे मोकळी सोडायची. अशी मुट्ठी आवळणं आणि सोडणं सतत 5 मिनिटे केल्यास हातातील नसांना उत्तेजन मिळतं आणि रक्ताभिसरण सुधारतं.
तिसरी मुद्रा
तिसरी मुद्रा करण्यासाठी हाताची खुली तळहात पुढे धरायची. अंगठ्याला पुढे वाकवून तळहाताला स्पर्श करायचा आणि पुन्हा मागे न्यायचा. हा पुढे-मागे होणारा मूव्हमेंट 3 ते 5 मिनिटे केल्यास हार्टसाठी फायदेशीर ठरतो. या प्रक्रियेने हाताच्या स्नायूंना बळ मिळून नर्व्ह सिग्नलिंगमध्येही सुधारणा दिसते. योगा एक्सपर्ट सांगतात की या मुद्रांचा परिणाम जास्त चांगला हवा असेल तर त्यात डीप ब्रीदिंगचा समावेश करावा. खोल श्वास घेत घेत या हालचाली केल्यास शरीर रिलॅक्स मोडमध्ये जातं, रक्तप्रवाह सुरळीत होतो, हार्ट आणि ब्रेन यांच्यातील सिग्नलिंग सुधारते आणि एंग्जायटी कमी होते.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.