Sakshi Sunil Jadhav
कर्माचा लेखाजोखा आज बघावा लागेल. "वृत्ती तसे फल देणारा आजचा दिवस आहे. कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम मिळतील.
भाग्याला नात्याची जोड असा आजचा दिवस आहे. आपल्या कुटुंबातील लोकांसह मोठे प्रवास होतील.
काही गोष्टी स्वतःसाठी काही दुसऱ्यासाठी करायच्या असतात. आपल्याला आज इतरांसाठी बरेच करावे लागेल मात्र साथ फक्त तुमची तुम्हालाच असेल.
"अरे संसार संसार" कितीही केले तरी कमी असा दिवस आहे. धावपळ दगदग होईल. कामात विशेष श्रम घ्यावे लागतील. कोर्टाच्या कामात मात्र यश आहे.
आज दिनचर्या डळमळीत राहील. कामात अपमान सुध्दा होईल. अनेक त्रास सहन करून पुढे जावे लागेल. तब्येत जपा.
आपली सृजनशीलता वाढवण्यासाठी विशेष प्रयत्नांत रहाल. संतती आपल्याला चांगले समाधान देण्याचा योग आहे. कला, क्रीडा क्षेत्रामध्ये घोडदौड होईल. दिवस उत्तम आहे.
सर्व सुखे मिळतील. शेतीची कामे जोमाने होतील जागा क्रय विक्रय यामध्ये व्यवहार होतील. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला असेल तर आज तो पूर्ण होईल.
श्रम होतील पण यश मिळेल.आपल्या जिद्द आणि चिकाटीने ते खेचून आणाल. मुळात आपली रास फिनिक्स सारखी आहे. "मोडेन पण वाकणार नाही" असेही गुण आहेत.
गोड खाण्याची इच्छा होईल. कामात वेगळेपण आणण्याचा आज खटाटोप असेल. जोडीदाराबरोबर दिलजमाई करावी लागेल. धनयोग चांगले आहेत.
मन ध्यानाकडे ओढ घेईल. हा वेगळा आनंद घेण्यात व्यस्त असाल. खरेदी कराल. आपला प्रभाव इतरांवर राहील. दिवस उद्योगात असणारा आहे.
परदेशी प्रवास होईल. मनस्वास्थ्य सांभाळावे लागेल. अध्यात्मात प्रगती होण्यासाठी दिवस चांगला आहे. मोठे प्रवास होतील.
जेवढे जपाल तेवढा आप्तस्वकीयांशी जिव्हाळा वाढलेला आहे. आता त्या प्रेमाचे फळे चाखण्याचा योग आला आहे. इतर अनेक लाभ होतील. दिवस चांगला आहे.