Sakshi Sunil Jadhav
मुंबईच्या गजबजाटात शांतता शोधणाऱ्यांसाठी 'छोटा काश्मीर' हे एक उत्तम ठिकाण ठरत आहे. आरे कॉलनीत वसलेलं हे पर्यटनस्थळ वर्षभर आकर्षणाचा केंद्रबिंदू राहते.
छोटा काश्मीर हे गोरेगावजवळील आरे कॉलनी परिसरात स्थित असून शहराच्या मध्यभागी हिरवाईने नटलेलं एक सुंदर ठिकाण आहे.
तुम्हाला इथे विविध रंगांच्या फुलांच्या प्रजाती पाहता येतील. ही फुलं वर्षभर फुलत असतात याने परिसर सदैव रंगीत आणि आकर्षक दिसतो.
गार गवताची मोठी लांब सडक लॉन आणि परिसरातील स्वच्छता पर्यटकांना शांतता आणि ताजेपणाचा अनुभव देते.
छोटा काश्मिर जवळील उंच नारळाची आणि ताडाच्या झाडांची रांग पाहताच पर्यटकांना पर्वतीय काश्मीरची आठवण येते.
येथील वातावरण, वनराई आणि शांत परिसर पाहूनच या स्थळाला ‘छोटा काश्मीर’ हे नाव मिळालं असे मानले जाते.
कुटुंबीय, मित्रमैत्रिणी किंवा ग्रुप ट्रिपसाठी हे ठिकाण उत्तम असल्याने अनेक जण येथे पिकनिकसाठी येतात. मात्र प्रवेशासाठी पूर्वपरवानगी आवश्यक असते.
छोटा काश्मीरपासून दोन किलोमीटर अंतरावर आणखी एक प्रसिद्ध गार्डन असून ते ‘पिकनिक स्पॉट’ म्हणून ओळखले जाते.
येथून जवळचे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, सांताक्रूझ आहे. तसेच सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन गोरेगाव (पश्चिम) असून बससेनेसाठी गोरेगाव बस डेपो येथे आहे.