Sakshi Sunil Jadhav
सध्या लग्नाच्या धामधुमीचे दिवस सुरु आहेत. विवाह, साखरपुडा आणि इतर मंगल कार्यांमध्ये नातेवाईक एकमेकांना भेटवस्तू देतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू लग्नात भेट देणं अत्यंत अशुभ मानले जाते. अशा वस्तू नव्या जोडप्याच्या जीवनात नकारात्मक ऊर्जा, तणाव आणि आर्थिक अडचणी निर्माण करू शकतात.
ज्योतिषशास्त्रानुसार यांनी सांगितले की, काही वस्तू भेट दिल्यास सौभाग्य वाढतं, तर काही वस्तू वैवाहिक जीवनात अडथळे आणू शकतात. चला जाणून घेऊया काय देऊ नये आणि काय देणे शुभ मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार काळा रंग नकारात्मकता, तणाव आणि मतभेद दर्शवतो. त्यामुळे काळे कपडे, शूज, वॉच किंवा अॅक्सेसरीज भेट देऊ नयेत.
जरी परफ्यूम सुगंधासाठी दिला जातो, तरी वास्तुशास्त्रानुसार हे भेट देणे अशुभ मानले जाते. यामुळे वैवाहिक जीवनात अस्थिरता येऊ शकते.
लग्नात वॉलेट किंवा पर्स भेट देऊ नये. असे मानले जाते की, यामुळे धन टिकत नाही आणि आर्थिक अडचणी वाढतात.
चाकू, कात्री किंवा इतर धारदार वस्तू संबंधात कटुता आणि वाद वाढवतात. त्यामुळे नव्या जोडप्याला या भेटवस्तू देणे टाळावे.
काही संस्कृतींमध्ये घड्याळ वेळ, आयुष्य आणि नात्यांच्या मर्यादा दर्शवते. त्यामुळे हे भेट देणे टाळावे.
रुपयांनी भरलेली चांदीचा गल्ला हा धनवृद्धी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप शुभ मानला जातो.
जोडप्यांसाठी बेडशीट किंवा गृहसजावट सामान तुम्ही देऊ शकता. किंवा गोड पदार्थही भेट वस्तू म्हणून देऊ शकता.